आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Steel Production In Large Plants Under Normal Conditions, Small Ones About To Shut Production

औद्योगिक वृत्तांत:मोठ्या प्लँटमध्ये स्टील उत्पादन सामान्य स्थितीत, छोट्यांना टाळे

सतीश चंद्राकर, शशी कुमार| रायपूर, रांचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या एका प्लँटमध्ये आक्सिजन नेताना ट्रक. - Divya Marathi
जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या एका प्लँटमध्ये आक्सिजन नेताना ट्रक.
  • मेडिकलसाठीच्या ऑक्सिजनचा परिणाम नाही

कोरोना रुग्णांसाठी आपल्या कारखान्यांतून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतरही बहुताश मोठ्या पोलाद निर्मिती प्रकल्पांत उत्पादनावर विशेष परिणाम झाला नाही. ऑक्सिजनची थोडी घट झाली आहे, त्याची भरपाई कंपन्या जास्त ऑक्सिजन वापराचे उत्पादन कमी करत आहेत. मात्र, ऑक्सिजनचा औद्योगिक पुरवठा रोखल्यामुळे पोलादाच्या लहान कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

बोकारो स्टील लिमिटेडचे(बीएसएल) वरिष्ठ अधिकारी एम. धान यांनी सांगितले की, बीएसएल आपल्या पूर्ण क्षमतेने उत्पादन करत आहेत. पोलाद उत्पादनात गॅस ऑक्सिजनचा वापर होतो. वैद्यकीय कारणासाठी लिक्विड ऑक्सिजन पाठवला जात आहे. पोलाद उत्पादनासाठी पुरेसे वायुरूप ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय वापरासाठी बीएसएल स्वतंत्रपणे १५० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन तयार करत आहे. टाटा स्टीलच्या प्रवक्त्यांनीही सांगितले की, कंपनी आपल्या संपूर्ण क्षमतेने अन्य स्टील व आयर्न उत्पादन करत आहे. मेडिकल पुरवठ्यासाठी कंपनी पूर्ण भारतात रोज १००० एमटीपेक्षा जास्त लिक्विड ऑक्सिजन निर्मिती करत आहे.

जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे सीईओ व्ही.आर. शर्मा यांनी सांगितले की, त्यांची कंपनी सुमारे १०% ऑक्सिजन मेडिकल पुरवठ्यात देत आहे. त्याच्या भरपाईसाठी कंपनीने जास्त ऑक्सिजनचा वापर होणाऱ्या रिफाइन उत्पादकांत कपात केली आहे. याच्या जागी कमी ऑक्सिजन घेणारे उत्पादन केले जात आहे. औद्योगिक सूत्रांनुसार, देशात लॉकडाऊनमुळे स्टीलच्या मागणीत घट आली आहे. मात्र, निर्यातीच्या चांगल्या मागणीमुळे कंपन्या पूर्ण क्षमतेने उत्पादन करत आहेत.

यामुळे जास्त परिणाम नाही

  • कमी ऑक्सिजनच्या उत्पादनांची निर्मिती वाढवून भरपाई केली जात आहे.
  • कंपन्यांनी जास्त ऑक्सिजन वापराच्या उत्पादनांची निर्मिती घटवली.
  • पोलाद निर्मितीत द्रवरूप नव्हे तर गॅस ऑक्सिजनचा वापर होतो.

६०% पेक्षा जास्त लहान स्टील प्लँटला टाळे

झारखंड आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या कंपन्यांशिवाय शेकडो लहान पोलाद प्रकल्पही आहेत. त्यांचे स्वत:चे ऑक्सिजन प्लँट नसतात, मात्र हे ऑक्सिजनच्या औद्योगिक पुरवठ्यावर अवलंबून असतात. केंद्र सरकारने २२ एप्रिलपासून ऑक्सिजनच्या औद्योगिक पुरवठ्यास मनाई केली आहे. यामुळे या कंपन्यांच्या शाखांना टाळे लागले आहेत.

उर्वरित ४० टक्के प्लँटही ४० टक्के ते ५० टक्के उत्पादन क्षमतेने सुरू आहेत. ऑक्सिजन टंचाईमुळे त्यांना लवकरच टाळे लागण्याची शक्यता आहे. छत्तीसगड मिनी स्टील प्लँट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सुराणा यांनी भास्करला सांगितले की, कारखाने बंद असल्याने मजुरांसमोर बेकारी आणि स्थलांतराची समस्या निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...