आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुभ दीपावली:शेअर बाजारात तेजीचा मुहूर्त; सेन्सेक्स, निफ्टी सर्वकालीन उच्चांकावर बंद

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटकाळातही सेन्सेक्सने दिला 11 टक्क्यांचा परतावा, निफ्टीचाही 10% रिटर्न

दीपावलीच्या मुहूर्त सत्रात शनिवारी शेअर बाजारात तेजीचा धमाका दिसला. संवत्सर २०७७ च्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स १९४.९८ अंकांच्या वाढीसह ४३६३७. ९८ तर निफ्टी ६०.३० अंकांच्या वाढीसह १२७८०.२५ वर स्थिरावले.

मुहूर्त सत्राची सुरुवात तेजीने झाली. प्रारंभी सेन्सेक्सने ३८०.७६ अंकांची उसळी घेतली होती, तर निफ्टीने ११७.८५ अंकांच्या वाढीसह १२८०० चा टप्पा ओलांडला होता. या उच्चांकावर काही प्रमाणात नफावसुली झाल्याचे दिसले. सत्राच्या प्रारंभापासूनच गुंतवणूकदारांचा खरेदीवर भर दिसला. निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक ०.६७ टक्के तर निफ्टी मिडकप निर्देशांक ०.३८ अंकांनी वधारला. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी आयटी निर्देशांकाने मुहूर्त सत्रात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५० निर्देशांकातील बीपीसीएल, आयओसी, टाटा मोटर्स, एचजीएफसी लाइल आणि सन फार्मा हे समभाग टॉप गेनर ठरले. तर हिंदाल्को, हीरो मोटोकॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय आणि बजाज फायनान्स टॉप लुझर ठरले.

सोमवारी शेअर बाजार बंद :

मुहूर्ताच्या सत्रात, मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकातील भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि ओएनजीसी या समभागांत १.१७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. १६ नोव्हेंबरला दिवाळी आणि बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजाराला सुटी असल्याने त्या दिवशी मुंबई तसेच निफ्टी बंद राहतील.

एक्स्पर्ट व्ह्यू : संकटकाळातही सेन्सेक्सने दिला ११ टक्क्यांचा परतावा, निफ्टीचाही १०% रिटर्न

> मागील संवत्सरात सेन्सेक्सने ११.२३ टक्के तर निफ्टीने ९.८१ टक्के परतावा दिला आहे. कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मरगळ, देशाचा कोसळलेला आर्थिक विकास दर या पार्श्वभूमीवर दोन्ही शेअर बाजारांतील निर्देशांकांनी चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना खुश केले आहे.

> संवत्सराच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीने आपले सर्वकालीन उच्चांक नोंदवले. संवत्सर २०७६ मध्ये अर्थात २०१९ मधील दिवाळीपासून ते यंदाच्या दिवाळीपर्यंत सेन्सेक्सने ४३८४.९४ अंकांची कमाई केली तर निफ्टी ११३६.०५ अंकांनी वधारला. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणूक सुरूच ठेवावी. एलकेपी सिक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च हेड एस. रंगराजन यांच्या मते, आगामी काळासाठी अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, रेमंड आणि पाॅलिकॅप या कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देऊ शकतील.

> आगामी काळाचा विचार करता जागतिक स्तरावरील बदललेली राजकीय स्थिती, कोविडची लस आली तर आणि लॉकडाऊन पूर्णपणे उघडल्यानंतर त्याचा निश्चित फायदा देशाला होईल. विविध आर्थिक क्षेत्रांना त्याचा लाभ होईल. बँकिंग, ऑटो, रिअॅल्टी, एफएमसीजी, पर्यटन, मनोरंजन आणि विमान सेवा क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. गुंतवणूक करताना ‘बाय अँड डीप’ चे तंत्र वापरावे, म्हणजे मंदीच्या वेळी खरेदी, तेजीच्या वेळी टार्गेटनुसार विक्री असे व्यवहार करावेत, म्हणजे नुकसान होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...