आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market BSE NSE Sensex Update; Gold And Silver Rate Price | Rupee Exchange Rate

शेअर बाजारात मोठी तेजी:सेन्सेक्स 582 अंकांच्या वाढीसह 59,689 वर बंद, अदानी समूहाचे 10 पैकी 7 शेअर्स घसरले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी (5 एप्रिल) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 582 अंकांच्या वाढीसह 59,689 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीही 159 अंकांनी वधारला. तो 17,557 च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 20 समभाग वधारले आणि 10 घसरले.

अदानी समूहाचे 10 पैकी 7 शेअर्स घसरले
अदानी समूहाच्या 10 पैकी 7 शेअर्समध्ये घसरण होत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 0.93% ची घसरण झाली आहे. दुसरीकडे, अदानी विल्मर, पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटच्या समभागात तेजी आली.

अदानी एंटरप्रायझेसमध्ये 1.88% घसरण

कंपनीतेजी/घसरण
अदानी एंटरप्रायझेस-0.93%
अदानी ट्रान्समिशन-1.90%
अदानी पोर्ट्स+1.30%
अदानी ृ विल्मर+0.57%
अदानी पॉवर-0.31%
अदानी टोटल गॅस-2.29%
अदानी ग्रीन एनर्जी-1.44%
अंबुजा सीमेंट+1.44%
ACC-1.11%
NDTV-0.75%

अमेरिकी बाजारात घसरण
आज भारतीय बाजारांसाठी जागतिक संकेत संमिश्र आहेत. SGX निफ्टी आणि डाऊ फ्युचर्समध्ये किंचित वाढ आहे. दुसरीकडे, काल अमेरिकी बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स जवळपास 200 अंकांनी घसरून बंद झाला. त्याच वेळी, S&P 500 आणि Nasdaq 0.50% पेक्षा जास्त खाली होते.

मार्चमध्ये FII ने 7,936 कोटी रुपयांची गुंतवणूक केली
2023 मध्ये मार्च हा पहिला महिना होता, जेव्हा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. गेल्या महिन्यात त्यांनी भारतीय बाजारात ७,९३६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये 5,294 कोटी रुपये आणि जानेवारीत 28,852 कोटी रुपये काढले होते. विश्लेषकांच्या मते, बाजारात स्थिरता परत येण्याचे हे लक्षण आहे.

सोमवारी शेअर बाजारात तेजी होती
यापूर्वी सोमवारी म्हणजेच 3 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 114 अंकांनी वाढून 59,106 वर पोहोचला. निफ्टीही 38 अंकांनी वधारला. तो 17,398 च्या पातळीवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग वधारले आणि 8 घसरले.