आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट बंद; सेन्सेक्स 37 अंकांनी वधारला

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी चढ-उतारानंतर प्रमुख निर्देशांक जवळजवळ सपाट बंद झाले. सेन्सेक्स सुमारे ३७ अंकांच्या किंचित वाढीसह ५८,८०३ वर बंद झाला. निफ्टीमध्ये ३ अंकांची घसरण पाहायला मिळाली. ते १७,५३९ वर बंद झाले. विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारात संमिश्र प्रवृत्तीच्या दरम्यान देशांतर्गत बाजाराला मजबूत दिशा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. अमेरिकेत राेजगाराचे आकडे प्रसिद्ध हाेण्याआधी जागतिक बाजारात विक्रीचा दबाव राहिला. रोजगारांच्या आकड्यांनुसार, येणाऱ्या काळात फेडरल रिझर्व्हच्या पावलाविषयी चिन्हे मिळतील. ओपेक प्लसच्या बैठकीच्या आधी कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळाली आहे.

जागतिक वाढ कमकुवत होणे हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीतही ओपेक प्लसच्या बैठकीत क्रूडचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. डॉलर इंडेक्स आणि यूएस बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे नजीकच्या काळात देशांतर्गत बाजारात अधिक अस्थिरता दिसू शकते.

सोने-चांदी चमकली दुसरीकडे म्हणजे सोन्या-चांदीच्या किमंतीतही शुक्रवारी वाढ झाल्याचे दिसून आले. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

तर चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज 52,250 रुपये प्रति किलोवर चांदीचा भाव पोहोचला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी कमजोर झालेला होता.

बातम्या आणखी आहेत...