आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:रेपो दरात वाढ होऊनही शेअर बाजार काहीशा वाढीवर बंद

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेपो दरात ०.५०% ची मोठी वाढ होऊनही शुक्रवारी शेअर बाजार किरकोळ वाढला. सेन्सेक्स ८९ अंकांनी वाढून ५८,३८८ वर आणि निफ्टी १५.५० अंकांनी वाढून १७,३९७.५० वर बंद झाला. खरं तर, बाजाराला आधीपासूनच आशा होती की, रिजर्व्ह बँक रेपो रेट ०.३५-०.५०% वाढवेल. सेन्सेक्सचे शेअर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, पावरग्रिड, इन्फोसिस, विप्रो आणि अॅक्सिस बँक काठावर बंद झाले. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, रिलायन्स आणि इंडसइंड बँकेमध्ये घसरण दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...