आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market Crash | Marathi News | Sensex Crash Over 1300 Points Due To Corona New Variant Fear, Key Factors, Pharma Sector Remains On Top

नव्या व्हेरिएंटचा फटका:सेन्सेक्समध्ये 1600 पॉइंट्सची घसरण, निफ्टीत सुद्धा 550 पेक्षा अधिक पॉइंटने घट; ही आहेत मार्केट कोसळण्याची तीन कारणे

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजाराचा शेवटचा वर्किंग डे शुक्रवारी शेअर मार्केट निर्देशांकात मोठी घट दिसून आली आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 1687.94 पॉइंट्स म्हणजेच 2.87% ने घसरला. सेन्सेक्सचा निर्देशांक घसरून आता 57,107.15 वर आला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात सुद्धा घट पाहायला मिळाली. निफ्टी 550.55 पॉइंटने घसले. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्याने अर्थव्यवस्थेत ही घसरण पाहायला मिळाली असावी. नवीन व्हेरिएंटमुळे गुंतवणूकदार घाबरलेले पाहायला मिळत आहेत.

मार्केट क्रॅश होण्यामागील 3 कारणे

कोरोनाचा नवा व्हेरिएंट
दक्षिण आफ्रीकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट समोर आल्यानंतर भारतात सुद्धा केंद्राकडून अलर्ट जारी करताना राज्यांना चाचण्या वाढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच, परदेशातून भारतात येणाऱ्यांच्या आरोग्यावर सरकार करडी नजर ठेवणार आहे.

FII सेलिंग
एनएसईकडून मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे, फॉरेन पोर्टफोलियो इनव्हेस्ट (FPI) ने देशातील स्टॉक्समध्ये 2,300.65 कोटी रुपयांची विक्री केली आहे. ही विक्री डॉमेस्टिक इंस्टिट्यूशनल इनव्हेस्टर्स (DIIs) च्या खरेदीपेक्षा अधिक आहे. वाढलेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी केला.

आशियाई मार्केटमध्ये घसरण
आशिया खंडातील सर्वच मार्केट पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला आहे. SGX निफ्टी, निक्केई, स्ट्रेट टाइम्स, हँगसेंग, तैवान वेटेड, कोस्पी, शांघाय कंपोझिट अशा सर्वच बाजारांमध्ये 1-2% ची घसरण झाली आहे.

11 पैकी 10 क्षेत्रांच्या इंडेक्समध्ये घट
फार्मा व्यतिरिक्त इतर सर्वच क्षेत्रांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळाली आहे. सर्वात मोठी घसरण रियल्टी, मीडिया आणि बँकिंगच्या स्टॉक्समध्ये दिसून आली.

सेंसेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्सवर धोक्याची घंटा
सेंसेक्सच्या 30 पैकी 29 शेअरवर लाल रंग दिसून आला. केवळ डॉ. रेड्डीज यांचे शेअर वाढलेले दिसून आले. तर सर्वाधिक घसरण बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनांस, मारुतीच्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली.

बातम्या आणखी आहेत...