आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Divya Marathi Knowledge| Stock Market | Webinar On How To Get Profit From Stock Market And Mutual Funds With Madhusudan Kela, Nilesh Shah And Girish Agrawal

दिव्य मराठी नॉलेज सिरीज अंतर्गत खास आयोजन:शेअर बाजारातून नफा मिळविण्यासाठी धैर्य, ज्ञान आणि समय सूचकता आवश्यक -एक्सपर्ट

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी धाडस, सतर्कता, अनुभव आणि धैर्यासह समय सूचकता असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करूनही पैसा कमवू शकता. दिव्य मराठी नॉलेज सिरीज अंतर्गत स्टॉक मार्केटमधून पैसे कमविण्याच्या बाबतीत आयोजित वेबिनारमध्ये एक्सपर्ट मधुसूदन केला आणि निलेश शहा यांनी हा सल्ला दिला आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, देशात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 8 कोटींच्याही पुढे गेली आहे. त्यात विशेष म्हणजे, यातील 2 कोटी लोकांची भर ही गेल्या वर्षभरात पडली. परंतु, बहुतांश गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवणे आणि नफा मिळविण्याचे मूलभूत नियमांचे पालन करत नाहीत. तसेच असे काही गुंतवणूकदार आहेत की जे गुंतवणूक करण्यासाठी घाबरतात. तज्ज्ञांनी अनेक वास्तविक घटनांचा उल्लेख करून शेअर बाजारात आणि म्युचुअल फंडात शेकडो पट कमाई केलेल्यांची उदाहरणे दिली. या निमित्ताने दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन स्वर्गीय रमेशचंद्र अग्रवाल यांच्या शून्यातून शिखर गाठण्याच्या संघर्षाचाही उल्लेख केला.

कार्यक्रमाचे संचालन सीएनबीसी आवाजचे माजी व्यवस्थापकीय संपादक आलोक जोशी यांनी केला. यावेळी दैनिक भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल यांचीही उपस्थिती होती. तज्ज्ञांनी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या आणि कोण-कोणत्या चुका टाळाव्या यावर आपले सल्ले दिले.

मार्केट तज्ज्ञ मधुसूदन केला, निलेश शहा यांचे महत्वाचे सल्ले...

1. आजच्या काळात बँकेत एफडी करणे म्हणजे पैशांची बचत नव्हे, तर पैसा गमावणे असे आहे. एका म्यूचुअल फंडात गुंतणूक केल्या तुमची गुंतवणूक 30 ते 50 कंपन्यांमध्ये होऊ शकतो.

2. आरोग्यासाठी तुम्ही जसा डॉक्टरांचा सल्ला घेता, तसाच पैशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोफेशनल फायनांस एडव्हायजरचा सल्ला घ्या.

3. म्युचुअल फंडाच्या फंडचे व्यवस्थापक खूप अनुभवी असतात. त्यामुळे यात गुंतणूक केल्यास धोका कमी आणि नफा जास्त असा लाभ मिळू शकतो.

4. मार्केटमध्ये नेहमीच चढ-उतार होत असतात. जास्त लोभ आणि जास्त भीती बाळगल्यास स्टॉक मार्केटमधून नफा मिळवता येणार नाही.

वेबिनार पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=e4nvMxd3U5A

बातम्या आणखी आहेत...