आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex Today | Stock Market Latest Update, 19 December 2022 Share Market

तेजीत बंद झाला शेअर बाजार:सेन्सेक्स 468 अंकांनी वाढून 61,806 वर बंद झाला, ऑटो शेअर्स सर्वाधिक वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी (19 डिसेंबर) तेजी पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यातील सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारच्या बाजारात तेजी दिसून आली.

सेन्सेक्स 468 अंकांच्या वाढीसह 61,806 च्या अंकावर बंद झाला. निफ्टी 151 अंकांनी वाढून 18,420 च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 समभागांत वाढ झाली. त्याचवेळी केवळ 6 शेअर्स घसरले होते.

अदानी पोर्ट्स टॉप गेनर
अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, एम अँड एम, आयशर मोटर्स, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल या कंपन्यांचा निफ्टीमध्ये वाढलेल्या 42 कंपन्यांमध्ये समावेश होता. त्याच वेळी, टीसीएस, ओएनजीसी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, सन फार्मा, इंडसइंड बँकेसह 8 निफ्टी समभागात घसरण झाली.

ऑटो सेक्टरमध्ये 1.59% वाढ

नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरील 11 पैकी 9 क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. ऑटो सेक्टरमध्ये सर्वाधिक 1.59% वाढ झाली. FMCG आणि धातू क्षेत्रामध्ये 1% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. बँक, वित्तीय सेवा, मीडिया, फार्मा, रियल्टी आणि खाजगी बँक क्षेत्रांनाही काही अंशी गती मिळाली. फक्त IT आणि PSU बँक क्षेत्रात घसरण झाली.

शुक्रवारचा बाजार घसरणीत बंद झाला होता
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (16 डिसेंबर) शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स 461 अंकांच्या घसरणीसह 61,337 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी, निफ्टी 145 अंकांनी वाढून 18,269 च्या पातळीवर पोहोचला होता.

बातम्या आणखी आहेत...