आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Stock Market Latest Update: March 24 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

शेअर मार्केट : 1414 अंकांच्या वाढीसह सुरु झालेल्या बाजारात आता चढ-उतार कायम , डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

Mumbai6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेन्सेक्स 426 अंकांनी आणि निफ्टी 115 पॉइंट्सनी वधारला आहे

मुंबई - शेअर बाजार मंगळवारी 1414 अंकांच्या वाढीसह उघडला. सेन्सेक्स 5.58% (1450.71) अंकांनी आणि निफ्टी 4.91% (373.35) पॉइंट्सच्या वाढीसह उघडला. परंतु आता बाजारात चढ-उतार कायम आहे. सध्या सेन्सेक्स 26,407.79 अंकांनी वर आणि निफ्टी 7,725.85 पॉइंट्सच्या वर व्यापार करत आहे. सोमवारी बाजारात ऐतिहासिक घसरण झाली होती. सेन्सेक्स 3934.72 अंकांनी खाली येत 25,981.24 वर आणि निफ्टी 1,135.20 पॉइंट्सनी कोसळत 7,610.25 वर बंद झाला होता. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाउन केले जात आहे. आतापर्यंत 30 राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती झाली आहे. गर्दी रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये कर्फ्यू लागू करावा लागला. यामुळे बाजारात गुंतवणूकदार घाबरले आहेत.

रुपया वधारला 
मंगळवारी रुपया 76.14 वर उघडला आणि डॉलरच्या तुलनेत 76.09 वर मजबूत झाला. सोमवारी रुपया 76.29 च्या निच्चांक स्तरावर बंद झाला होता. इतर आशियाई बाजारांच्या मजबुतीमुळे भारतीय बाजाराला चांगला संकेत मिळाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने तेथील बाजारपेठेत रोख वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यामुळे आशियाई बाजारात तेजी आली. 

0