आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसानंतर आज शेअर बाजारात वाढ:सेन्सेक्सने 547 अंकांची उसळी, निफ्टीने 16640 टप्पा पार केला, भारती एअरटेल, बजाज आघाडीवर

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील दोन दिवसाच्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीने बंद झाला. सेन्सेक्स 547.83 अंकांनी किंवा 0.99 टक्के वाढून 55816.32 वर आणि निफ्टी 158.00 अंकांनी किंवा 0.96 टक्क्यांनी वाढून 16641.80 वर बंद झाला.

निफ्टीत सन फार्मा, एसबीआय, एल अँड टी, डिव्हिस लॅब्स आणि एशियन पेंट्स सर्वाधिक वाढले. तसेच भारती एअरटेल, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, यूपीएल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसली. बँक, आयटी, मेटल, ऑइल अँड गॅस, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, फार्मा निर्देशांक सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये 1-2 टक्केच्या वाढीसह संपले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.9 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.38 टक्क्यांनी वाढले. मंगळवारच्या 79.76 प्रति डॉलरच्या बंदच्या तुलनेत आज रुपया 14 पैशांनी घसरून 79.90 प्रति डॉलरवर बंद झालेला दिसला आहे.
FII आणि DII डेटा
26 जुलै म्हणजे मंगळवारी विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) बाजारातून 1548.29 कोटी रुपये काढून घेतले. या कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) बाजारात 999.36 कोटींची गुंतवणूक केली.

US बाजारात विक्री
युएस फेडने व्याजदर वाढवण्याआधी मंगळवारी युएस मार्केटमध्येही विक्री झाली. डाऊ जोन्समध्ये 229 अंकांची कमजोरी होती आणि तो 31,761.54 च्या पातळीवर बंद झाला. Nasdaq 220 अंकांनी घसरला आणि 11,562.57 वर बंद झाला. S & P 500 निर्देशांक 46 अंकांनी घसरला. 3,921.05 वर बंद झाला. महागाई आणि मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध आहेत. तर युएस फेडच्या निर्णयावर आज बाजाराची नजर राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...