आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market News I Latest News And Update I Sensex Fell 474.1 Points To 58,722.89 I Nifty Down 171.3 Points

शेअर बाजार अपडेट:सेन्सेक्स 474.1 अंकांनी घसरून 58,722.89 वर, निफ्टी 171.3 अंकांनी खाली

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर मार्केटमध्ये व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सुरूवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर काम करित होते. BSE सेन्सेक्सची सुरूवात कमजोरीने झाली 30 शेअर्सचा निर्देशांक 474.1 अंकांनी घसरून 58,722.89 वर आला. दुसरीकडे, NSE निफ्टी 171.3 अंकांनी घसरून 17,484.30 वर व्यवहार करित आहे.

इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, अ‌ॅक्सिस बॅंक, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे प्रमुख नुकसान झाले. पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, नेस्ले आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग वधारले. इतर आशियाई बाजारांमध्ये सेऊल, शांघाय, टोकियो आणि हाँगकाँगमध्ये घसरण सुरू होती. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झालेले होता.

मंगळवारी अशी होती शेअर बाजारातील स्थिती

मंगळवारी शेअर बाजारात व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी (6 सप्टेंबर) थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 48 अंकांनी घसरून 59,196 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 13 अंकानी घसरून 17,651 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग घसरले. तर 10 समभागात वाढ झाली होती. दुसरीकडे सोन्या-चांदीतही वाढ दिसून आली. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50761 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज 53,696 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी कमजोर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...