आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 59,141 वर बंद, निफ्टी 91.4 अंकानी वाढून 17,622 वर स्थिरावला

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजाराच्या आठवड्यातील पहिला दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजार सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 59,141 वर बंद झाला. तर निफ्टी 91.4 अंकानी वाढून 17,622 वर स्थिरावला आहे. दरम्यान, 30 शेअर्सच्या BSE सेन्सेक्समध्ये 23 समभाग वधारले आणि उर्वरित 7 शेअर्स तोट्यात पडले आहे.

भारतीय बाजारांनी सोमवारचे सत्र उच्च पातळीवर संपवले. BSE सेन्सेक्स 300.44 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी वाढून 59,141.23 वर बंद झाला. तर 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 91.4 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 17,622.25 वर स्थिरावला.

स्टॉक मार्केट टॉप गेनर्स आणि लूझर्स

सेन्सेक्स टॉप गेनर्स

1) M&M शेअर्स : 3 टक्क्यांनी वाढून 1,288.70 वर थांबला.

2) बजाज फायनान्स : 3 टक्क्यांनी वाढून 7,493.10 रुपयांवर बंद.

3) SBI चे शेअर्स 572.40 रुपयांवर संपले, जे शुक्रवारच्या बंद किंमतीपेक्षा सुमारे 2 टक्क्यांनी वाढले.

4) HUL समभाग : 2 टक्क्यांनी वाढून रु. 2,576.90 वर बंद झाले.

5) नेस्ले इंडिया शेअर्स : 2 टक्क्यांनी वाढून 18,749.10 रुपयांवर बंद झाला.

सेन्सेक्स टॉप लॉसर्स :

1) टाटा स्टील - 2.5 टक्क्यांनी कमी होऊन 103.15 रुपयांवर बंद

2) ICICI बँकेचे शेअर्स - 1 टक्क्यांनी कमी होऊन 898.45 रुपयांवर बंद

3) पॉवर ग्रिड शेअर्स- 1 टक्क्यांनी कमी होऊन 233 रुपयांवर संपले.

बातम्या आणखी आहेत...