आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market: Sensex Closes At 56816, Up 1039 Points, Banking Shares Rise 4% | Marathi News

शेअर बाजारात उत्साह:सेन्सेक्स 1039 अंकांच्या वाढीसह 56816 वर बंद, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये 4% वाढ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी झालेल्या जोरदार घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील (BSE) सेन्सेक्स 1,039 अंकांनी (1.86%) वाढून 56,816 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 312 अंकांनी (1.87%) वाढून 16,975 वर बंद झाला. बँकिंग समभागांनी बाजाराला जोरदार साथ दिली.

779 अंकांच्या तेजीसह उघडला बाजार
मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 779 अंकांनच्या तेजीसह 56,555 पातळीवर उघडला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने 56,860 ची उच्चांकी तर 56,389 ही नीचांकी पातळी गाठली होती. सेन्सेक्स मध्ये समावेश असलेल्या सर्व 30 समभागांपैकी, फक्त पॉवरग्रिड आणि सन फार्मा मध्ये किरकोळ घसरण नोंदवण्यात आली. आघाडीच्या समभागांमध्ये अल्ट्राटेक 4.18% वधारून बंद झाला. यानंतर इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँक 3-3% पेक्षा जास्त वाढले.

शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ
एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि आयटीसी या शेअर्समध्ये 2-2% पेक्षा जास्त वाढ झाली होते. नेस्ले, एशियन पेंट्स, विप्रो, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टीसीएस, कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 1% पेक्षा जास्त वाढ झाली.

एअरटेल, मारुती, टायटन, डॉ. रेड्डी आणि एनटीपीसी हे समभागही तेजीसह बंद झाले. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 256 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. मंगळवारी मार्केट कॅप 251.58 लाख कोटी होता.

निफ्टीतही तेजी
दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 312 अंकांच्या वाढीसह 16,975 वर बंद झाला. निफ्टी 16,876 वर उघडला आणि 16,987 च्या उच्च्चांकी तर 16,837 नीचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समावेश असलेले चार प्रमुख निर्देशांक नेक्स्ट 50, निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी फायनान्शियल मध्ये 2% पेक्षा जास्त वाढ झाली.

47 समभागांमध्ये वाढ
निफ्टीमध्ये समावेश असलेल्या 50 समभागांपैकी 47 तेजीसह बंद झाले तर केवळ 3 मध्ये घसरण नोंदवण्यात आली. सिप्ला, टाटा कंझ्युमर आणि सन फार्मा या कंपन्यांचे नुकसान झाले. अल्ट्राटेक, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो आणि इंडसइंड बँक या प्रमुख शेअरमध्ये तेजी दिसून आली. याआधी मंगळवारी मुंबई शेअर बाजारातील (BSE) सेन्सेक्स 709 अंकांच्या (1.26%) घसरणीसह 55,776 या पातळीवर आला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 208 अंकांच्या (1.23%) घसरणीसह 16,63 वर बंद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...