आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच मंगळवारी (2 मे) तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 189 अंकांच्या वाढीसह 61,301 च्या पातळीवर उघडला. निफ्टीही 72 अंकांनी वाढून 18,124 च्या पातळीवर उघडली. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 26 शेअर्समध्ये वाढ झाली असून फक्त 4 शेअर्समध्ये घसरण झाली. यापूर्वी 29 एप्रिल ते 1 मे म्हणजेच 3 दिवस शेअर बाजार पूर्णपणे बंद होता.
अंबुजा सिमेंट व टाटा स्टीलचे आज तिमाही निकाल
अंबुजा सिमेंट आणि टाटा स्टील या कंपन्यांचे आज चौथ्या तिमाहीचे निकाल लागणार आहेत. दुसरीकडे, टायटनचा निकाल 3 मे रोजी जाहीर होणार आहे. तर 4 मे रोजी Hero Moto, Dabur आणि TVS Motors चे निकाल जाहीर होतील. ब्रिटानिया आणि भारत फोर्जचे निकाल 5 मे रोजी जाहीर होणार.
अल्ट्राटेक सिमेंटच्या चौथ्या तिमाहीत नफ्यात 11% घट
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत, अल्ट्राटेक सिमेंटची विक्री वार्षिक 19% नी वाढून रु. 18,436 कोटी झाली आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 15557 कोटी रुपये होते. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अल्ट्रा टेक सिमेंटचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 1478 कोटी रुपयांच्या तुलनेत 1666 कोटी रुपये होता. म्हणजेच 11% ने घट झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डाची आज बैठक झाली
रिलायन्स इंडस्ट्रीजची आज बोर्ड बैठक आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या डिमर्जरबाबत आज अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. Jio Financial चा एक शेअर RIL च्या एका शेअरसाठी उपलब्ध असेल.
शुक्रवारी बाजारात होती घसरण
याआधी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (28 एप्रिल) शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 61,112 वर बंद झाला. निफ्टीही 137 अंकांनी वाढून 18,052 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 शेअर्समध्ये वाढ आणि आठमध्ये घट झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.