• Home
 • Business
 • Stock Market: The biggest decline in Sensex history, the BSE fell by 3934 points and the Nifty by 1110 points.

ऐतिहासिक घसरण : भारतीय शेअर बाजारांत 1 दिवसांत  मोठी घसरण, 14 लाख कोटी रुपये साफ


 • सेंसेक्समध्ये 13.15% घट आणि निफ्टी 12.7% सोबत बंद

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 10:22:58 AM IST

मुंबई : कोरोना विषाणू तेजीने फैलावत असताना सोमवारी देशातील शेअर बाजार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ३,९३५.७२ अंक(१३.१५%) घसरून २५,९८१.२४ वर बंद झाला. हा गेल्या चार वर्षांत याचा सर्वात कमी स्तर आहे. याआधी २७ डिसेंबर २०१६ ला हा २६,२१३.४४ वर बंद झाला होता. एनएसई निफ्टीत १,१३५.२० अंक(१२.९८%)ची घसरण नोंदली. हा ८००० अंक खाली जाऊन ७,६१०.२५ अंकावर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती १४.२२ लाख कोटी रुपये कमी झाली. बीएसईचे बाजार भांडवल १२.२५ लाख कोटी रुपये कमी झाले. बीएसईचे बाजार भांडवल १२.२५% घटून १०१.८७ लाख कोटी रुपये राहिले. गेल्या शुक्रवारी हे ११६.०९ लाख कोटी रु. होते. या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य ५३.६७ लाख कोटी रु.(३४.५१%) कमी झाले. ३१ डिसेंबर २०१८ रोजी बीएसईचे बाजार भांडवल १५५.५४ लाख कोटी रुपये होते. विश्लेषकांनुसार, भारतात आता कोरोना विषाणूचा प्रकोप अशा टप्प्यात पोहोचला आहे, जेथून तो चीन किंवा इटलीच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. युरोप आणि अमेरिकेतील मृत्यूच्या आकड्याने घसरण दिसते आहे.

 • १ दिवसाच्या घसरणीत १४.२२ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साफ
 • रिलायन्स इंडस्ट्रीचे समभाग १३.३७ टक्के कोसळून ८८३.३५ च्या स्तरावर कोसळले
 • नुकत्याच लिस्ट झालेल्या एसबीआय कार्ड्‌सच्या समभागांत १९.४५% मोठी घसरण
 • विश्लेषकांचे मत : कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णात घट आल्यावरच शेअर बाजारातील घसरण थांबेल
 • सोमवारी सेन्सेक्स १३.१५ टक्के आणि निफ्टी १२.९८ % घसरला, सेन्सेक्सच्या सर्व ३० कंपन्या कोसळल्या
 • सेन्सेक्स ३,९३६ अंक कोसळला, २५,९८१ वर बंद
 • निफ्टी १,१३५ घसरून ७,६१०.२५ वर बंद
 • स्टँडर्ड अँड प्युअर्सने जीडीपी वृद्धीचा अंदाज घटवला; २०२०-२१ साठी अंदाज ६.२% वरून घटवून ५.२%

एका महिन्यात दोनदा लोअर सर्किट


सोमवारी पहिल्या दोन तासांतील व्यवसायात सेन्सेक्स निफ्टी १० टक्के घसरल्यानंतर लोअर सर्किट लागले. यानंतर ४५ मिनिटांपर्यंत बाजारात ट्रेडिंग राेखली. बाजारात घसरणीचा दबाव पुन्हा सुरू झाल्यानंतर घसरणीचा दबाव आणखी वाढला. शेअर बाजारात लोअर सर्किट लागण्याची महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.. याआधी १३ मार्चला शेअर बाजाराचा व्यवसाय लोअर सर्किटमुळे थांबवला होता.


या महिन्यात सेन्सेक्समध्ये ३२.७%ची घसरण,सोने ९.४% पर्यत खाली आले


ज्या जेतीने कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे, त्याच वेगाने बाजारातून गुंतवणूकदार गायब होत आहेत. देशात ४ मार्चला अचानक २३ नवे प्रकरणे समोर आले होते. यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. ३ मार्चनंतर आतापर्यंत बाजार ३२.७३% पर्यंत खाली आला. तो ४१,९५३ च्या आपल्या पातळीवर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावरून ३८.०७% खाली आला आहे. जेव्हा शेअर बाजार पडतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यानंतर शेअर बाजारासोबत सोन्याचे भावही पडत आहेत. कोरोना प्रकरणातील वाढीमुळे सोने आपल्या ४४,४५८ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर स्वस्त झाले आहे. ३ मार्चला सेन्सेक्स ३८,६२३ अंकाच्या स्तरावर बंद झाला होता.


जगात कंपनी महसुलावर ९२९ लाख कोटी परिणाम


जगभरातल्या काॅर्पाेरेट महसुलावर १२ लाख काेटी डाॅलरचा (९२९ लाख काेटी रु.) परिणाम हाेईल. अमेरिकेचा काॅर्पाेरेट महसूल ४ लाख काेटी डाॅलर घटू शकताे. हा अहवाल अमेरिकेच्या ब्रिजवाॅटर असाेसिएट्ने प्रसिद्ध केला अाहे.


िवमान उत्पादक एअरबसने रद्द केला लाभांश


एअरबस या युराेपातील विमान उत्पादन कंपनीने २०१९ वर्षासाठी देण्यात येणारे प्रस्तावित लाभांश वितरण रद्द केले अाहे. कंपनीने विद्यमान अार्थिक वर्षासाठी अापल्या उत्पन्नाचा पूर्वअंदाजही परत घेतला अाहे.


१०० वर्षांतील सर्वात आव्हानात्मक स्थिती, सर्व ट्रेंड बदलताहेत : तज्ञ


ट्रेडिंग बुल्सचे विश्लेषक संतोष मीणा म्हणाले, गेल्या १०० वर्षांतील ही आव्हानात्मक स्थिती आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यास घसरणीचा टप्पा सुरू राहू शकतो. काही सुधारणा आल्यास बाजारात शॉर्ट टर्म तेजी येऊ शकते. जेव्हा एफआयआय बाजारातून पैसा काढला जातो तेव्हा डीआयआय तेेजीने बाजारात गुंतवणूक करतात.


रुग्णांच्या वाढत्या संख्येचा सेन्सेक्स, सोन्यावर परिणाम

 • तारीख : कोरोना : सेन्सेक्स : सोने
 • 03 मार्च : 01 : 38,623 : 43,474
 • 04 मार्च : 23 : 38,409 : 43,293
 • 05 मार्च : 01 : 38,470 : 44,458
 • 06 मार्च : 01 : 37,576 : 44,158
 • 07 मार्च : 03 : बंद राहिला : बंद राहिला
 • 08 मार्च : 35,634 : बंद राहिला
 • 09 मार्च : 06 : बंद राहिला : 44,353
 • 10 मार्च : 05 : बंद राहिला : 43,740
 • 11 मार्च : 21 : 35,697 : 43,355
 • 12 मार्च : 06 : 32,778 : 42,206
 • 13 मार्च : 07 : 34,103 : 40,348
 • 14 मार्च : 12 : बंद राहिला : बंद राहिला
 • 15 मार्च : 14 : बंद राहिला : बंद राहिला
 • 16 मार्च : 11 : 31,390 : 39,518
 • 17 मार्च : 21 : 30,579 : 40,244
 • 18 मार्च : 30 : 28,869 : 39,723
 • 19 मार्च : 31 : 28,288 : 39,831
 • 20 मार्च : 50 : 29,915 : 40,358


रुपया ९५ पैसे पडला, १ डॉलर ७६.१५ रुपये


भारतीय चलन रुपयावर कोरोना विषाणूचा परिणाम सुरूच आहे. सोमवारी रुपया नव्या उंचीवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात ९५ पैशांची घसरण आणि तो ७६.१५ च्या स्तरावर दिसला.
देशांतर्गत बाजारात मोठ्या विक्रीमुळे रुपयावर दबाव पाहायला मिळाला. १९ मार्चला प्रथमच ७५ च्या खाली गेला होता. इंटरबँक विदेशी चलन बाजारात कमकुवत सुरुवातीसह रुपया ७५.९० वर उघडला आणि हळूहळू आणखी घसरणीसह अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७६.१५ च्या नीचांकी
स्तरावर आला होता. शुक्रवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.२० वर बंद झाला होता.


स्टँडर्ड अँड प्युअर्सने जीडीपी वृद्धीचा अंदाज घटवला; २०२०-२१ साठी अंदाज ६.२% वरून घटवून ५.२%


नवी दिल्ली : अांतरराष्ट्रीय मानांकन संस्था स्टँडर्ड अँड प्युअर्स(एसअँडपी)ने साेमवारी भारतासाठी २०२०-२१ च्या जीडीपीच्या वृद्धीचा अाधीचा अंदाज घटवून ५.२% केला अाहे. याअाधी संस्थेने ६.५% वाढीचा अंदाज व्यक्त केला हाेता. काेराेना विषाणूमुळे अर्थव्यवस्थांमध्ये माेठ्या घसरणीत संस्थेने अंदाज घटवला अाहे. काेराेना विषाणूमुळे अाशिया प्रशांत क्षेत्रात सुमारे ६२,००० काेटी डाॅलरच्या कायम नुकसानीचा अंदाज अाहे. असे असले तरी त्यांनी त्याची देशनिहाय माहिती दिली नाही. संस्थेनुसार, भारताची चालू २०२१-२२ ची वृद्धी सात टक्के राहण्याचा अंदाजही घटवून ६.९% केला अाहे. चालू वित्त वर्षासाठी मानांकन संस्थेने जीडीपी वृद्धीचा अंदाज ५ टक्के ठेवला अाहे. संस्थेने २०२२-२३ अाणि २०२३-२४ साठी जीडीपी वृद्धी अंदाज सात टक्के सांगितला अाहे. महागाई दरातही येईल घट येऊ शकते.

X