आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंमिश्र जागतिक संकेतांदरम्यान गुरुवारी (2 मार्च) देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 58,909 वर बंद झाला. निफ्टीही कमजोर राहिला. 130 अंकांनी घसरून 17,320 च्या पातळीवर बंद झाला आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 घसरले तर फक्त 5 मध्ये वाढ दिसून आली.
ट्रान्समिशन, विल्मर, पॉवर, ग्रीन एनर्जी व NDTV प्रत्येकी 5% वाढले बाजारातील या घसरणीच्या काळात आज अदानी समूहाच्या सर्व 10 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 1.52% वाढले. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, विल्मर, पॉवर, ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्ही यांचे शेअर्स प्रत्येकी ५-५% वाढले. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स 3.06%, टोटल गॅस 3.86%, अंबुजा सिमेंट 4.50% आणि ACC 1.39% वाढले.
क्षेत्रीय निर्देशकांची सुरुवातीची स्थिती
मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात बँकिंग, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होत असताना आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरणीच्या व्यवहार होत आहे. तर स्मॉल कॅप किंचित वाढीसह तर मिडकॅप निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहे. याशिवाय सेन्सेक्सच्या 30 पैकी 8 शेअर्स वाढीसह तर 22 समभागात घसरण होत आहेत. तसेच निफ्टीच्या 50 समभागांपैकी 15 स्टॉक्समध्ये वाढ तर 35 मध्ये घसरणीसह व्यवहार होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.