आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 48 अंकांनी घसरून 59,196 वर बंद, सोन्या चांदीच्या दरात दुसऱ्या दिवशीही होती वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी शेअर बाजारात व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी (6 सप्टेंबर) थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 48 अंकांनी घसरून 59,196 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 13 अंकानी घसरून 17,651 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग घसरले. तर 10 समभागात वाढ झाली होती.

दुसरीकडे सोन्या-चांदीतही वाढ दिसून आली. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50761 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज 53,696 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी कमजोर झाला होता.

सोन्या चांदीच्या दरात दुसऱ्या दिवशीही तेजी

सोन्या-चांदीच्या दरात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून 51092 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. सोमवारी तो 50985 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झालेला होता. भावात 113 रुपयांनी वाढ झाली होती. आज चांदीचा भाव 563 रुपयांनी वाढून 54639 रुपये प्रति किलोवर बंद झाला. सोमवारी, चांदीचा भाव (आजचा चांदीचा दर) 428 रुपयांनी वाढला आणि तो 53980 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

24 कॅरेट सोन्याची किंमत
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या संकेतस्थळानुसार आज सोन्या चांदीच्या कॅरेटनिहाय किंमती सध्या आजच्या स्थितीत आहे.

  • सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 5077 रुपये प्रति ग्रॅम आहे.
  • 22 कॅरेट सोन्याची किंमत 4954 रुपये प्रति ग्रॅम.
  • 20 कॅरेट सोन्याची किंमत 4518 रुपये प्रति ग्रॅम,
  • 18 कॅरेट सोन्याची किंमत 4112 रुपये प्रति ग्रॅम
  • 14 कॅरेट सोन्याची किंमत 3274 रुपये प्रति ग्रॅम आहे.
बातम्या आणखी आहेत...