आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार अपडेट्स:सेन्सेक्स 442 अंकांनी वधारून 59,245 वर बंद, सोने, चांदी चमकली, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात आठवड्यातील पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (5 सप्टेंबर) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 442 अंकांनी वाढून 59,245 वर बंद झाला. निफ्टीही 126 अंकांच्या वाढीसह 17,665 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 समभागात वाढ पाहायला मिळाली. त्याचवेळी 6 समभागांमध्ये घसरण दिसून आली.

दुसरीकडे सोन्या-चांदीतच्या किमतीतही वाढ झाली. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर चांदीबद्दल सांगायचे झाले तर आज 53,363 रुपये प्रति किलोवर चांदीचा भाव पोहोचला होता. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी मजबूत झालेला दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...