आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार अपडेट्स:सेन्सेक्स 20 अंकांने वाढून 58,136 वर बंद; इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, एशिअन बॅंकेचे शेअर्स वधारले

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात म्हणावी तशी वाढ झालेली दिसून आली नाही. काही प्रमाणात शेअर्समध्ये वाढ होऊन बाजार बंद झाला. सेन्सेक्स 20.86 अंकांनी किंवा 0.04 टक्क्यांनी वाढून 58,136.36 वर बंद झाला. आणि निफ्टी 5.50 अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी वाढून 17,345.50 वर बंद झाला. इंडसइंड बँक, एशिअन बॅंक, पेंट्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि पॉवर ग्रिड कॉर्प या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

तर यूपीएल, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टेक महिंद्रा सर्वाधिक तोट्यात आहेत. PSU बँक आणि पॉवर निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढले. तर रियल्टी निर्देशांक 1.7 टक्के घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक वाढीसह बंद झाला.

झोमॅटोचे शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले

झोमॅटोचे शेअर्स 16 टक्क्यापेक्षा जास्त वाढले. झोमॅटोच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणी दरम्यान झोमॅटोच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सध्या, कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 54 रूपयांवर व्यवहार करित आहेत.

युएस मार्केटची स्थिती

युएस मार्केटबद्दल बोलायचे झाले तर 1 ऑगस्ट रोजी Nasdaq 0.18% म्हणजेच 21.71 अंकांनी घसरून 12,368.98 वर बंद झाला. युरोपीय बाजारातही घसरणीचा कल दिसून आला. लंडन स्टॉक एक्सचेंजचा FTCE 0.13 टक्के, फ्रान्सचा CAC 0.18 टक्के आणि जर्मनीचा DAX 0.03 टक्के खाली होता.

बातम्या आणखी आहेत...