आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांबवा’:‘शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवा’ ;महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे दोन लाख रुपये माफी दिली होती

मलकापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँकेच्या कृषी शाखेकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे दोन लाख रुपये माफी दिली होती. त्यामध्ये माफीस पात्र थकबाकी रकमेच्या ८५ टक्के रक्कम शासनाकडून संबंधित खात्याला वर्ग केली. उर्वरित १५ टक्के रक्कम एनपीए करून बँकेने खाते बंद केले. त्वरित कर्ज वाटप करण्याचे धोरणात्मक निर्णय शासन व बँक स्तरावर वरिष्ठ पातळीवर ठरला असतानाही स्टेट बँकेच्या कृषी शाखेन तीनशे त चारशे माफीस पात्र खाते शासनाची ८५ टक्के रक्कम जमा असताना सुद्धा १५ टक्के रक्कम समायोजन न केल्यामुळे शेतकरी अजूनही थकित दिसत आहे. ते नवीन कर्ज घेण्यास पात्र नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना १५ टक्के रक्कम अधिक व्याजाचा भरणा केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून बँकेने १५ टक्के रक्कम व्याजासह भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना परत करावी, असा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...