आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वसूल करणाऱ्यांवर अंकुश:कर्जवसुली एजंटविरोधातकठोर नियम : आरबीआय

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल कर्ज सुरक्षित करण्यासाठी आणि बळजबरीने कर्ज वसूल करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच दिशानिर्देश देणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, कर्जवसुलीसाठी एजंट कठोर पद्धतीचा अवलंब करत आहेत. वसुलीसाठी चुकीच्या वेळी फोन करतात आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करतात. आम्ही अशी प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या उपयोगामुळे डिजिटल फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकरणांत आरबीआय कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. देशात अशा अनेक प्रकरणांत कर्जाच्या वसुलीसाठी काही संस्था गैरमार्गाचा अवलंब करत असल्याचे निदर्शनास आले होते.

बातम्या आणखी आहेत...