आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात:यंदा साखर निर्यात 85 लाख टनांवर जाण्याचा अंदाज, साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबरमध्ये संपणार असलेल्या २०२१-२२ च्या विद्यमान विपणन हंगामात देशाची साखर निर्यात ८५ लाख टनांवर जाण्याचा अंदाज इस्मा या साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला आहे.

देशाने साखर निर्यातीसाठी ७२ लाख टनांचे कंत्राट केले असून या वर्षी मार्चअखेरपर्यंत प्रत्यक्ष निर्यात ५६.५७ लाख टन झाली असल्याचे इस्माने म्हटले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालते. मार्चअखेरपर्यंत ३६६ गिरण्या सुरू असल्याने गाळप सुरू आहे, तर १५२ गिरण्यांनी गाळप बंद केले आहे. जागतिक बाजारपेठ चालू हंगामात भारताकडून ८५ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा करत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे ताज्या साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करताना इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सांगितले.

इस्माच्या म्हणण्यानुसार, २०२१-२२ या विद्यमान विपणन वर्षाच्या मार्चपर्यंत साखरेचे उत्पादन ३०९.८७ लाख टनांवर पोहोचले आहे,

बातम्या आणखी आहेत...