आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Survey Of Retailers Association Of India : Retail Sales In The Retail Sector, 7% Difference From Last Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुधारणा:सामान्य होण्याच्या स्थितीत रिटेल क्षेत्रात किरकोळ विक्री, गतवर्षीपेक्षा 7% फरक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाची पाहणी, फेब्रुवारीत 93 %सुधारणा

कोविड-१९ मुळे िकरकोळ विक्रीत आलेली घसरण हळूहळू कमी होत आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या(राई) रिटेल बिझनेस सर्व्हेच्या १३ व्या आवृत्तीत नमूद केले की, गेल्या फेब्रुवारीत कोविडपूर्वची ९३ टक्के विक्री पूर्ववत झाली आहे. आता केवळ ७ टक्क्यांची घसरण शिल्लक आहे. पाहणीनुसार, सर्वात जास्त सुधारणा आणि सकारात्मक झोन कंझ्युमर ड्युरेबल्स आणि क्विक रेस्तराँमध्ये(क्यूएसआर) दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वार्षिक आधारावर १५ टक्क्यांची सकारात्मक वृद्धी आहे. दुसरीकडे, क्विक सर्व्हिस रेस्तराँमध्ये १८ टक्क्यांची सकारात्मक वृद्धी नोंदली आहे. मात्र, पादत्राणे, ब्यूटी, वेलनेस अँड पर्सनल केअर, क्रीडा साहित्य आणि अन्नधान्य आणि किराण्याच्या किरकोळ विक्रीत सध्या सकारात्मक वृद्धी दिसत नाही. मात्र, वार्षिक आधारावर दरमहा सुधारणा दिसत आहे.

मार्चनंतर या क्षेत्रात सकारात्मक वाढ होईल, अशी आशा आहे. प्रदेशानुसारही सुधारणा दिसत आहे. फेब्रुवारीत पूर्व भारतात २ टक्क्यांची सकारात्मक वाढ होती. दक्षिण व उत्तर भारतात विक्री वार्षिक आधारावर कोविड पूर्व पातळीवर केवळ ६ आणि ९ टक्के खाली आहे. पश्चिम भारतात गती थोडी मंद आहे आणि ही सध्या कोविड पूर्व पातळीपेक्षा १६ टक्के खाली आहे. रिटेलर्सना २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये कोविडपूर्व पातळीची विक्री बहाल होण्याची आशा आहे. लसीकरण सुरू झाले मात्र स्थिती सुधारण्यात अवधी लागू शकतो. सुधारणेसाठी बिगर पारंपरिक उपाय स्वीकारावे लागतील व यामध्ये सरकारची मदतही आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...