आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०२२ मध्ये ऑटोमोबाइल कंपन्यांनी ३७.९३ लाख कार विकल्या. याबाबतीत २०१८ चा विक्रम मोडला. चार वर्षांपूर्वी देशात ३३.८ लाख कार विकल्या होत्या. गेल्या वर्षीचा आकडा यापेक्षा १२.२१% जास्त असून २०२१ च्या तुलनेत २३.१०% जास्त आहे. मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जेवढ्या कार विकल्या गेल्या त्यात ४५.३०% वाटा एसयूव्हीचा होता. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या ग्राहकाने एसयूव्ही घेतली.
ऑटाेमोबाइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनुसार, २०२२ मध्ये कोरोनाकाळात रखडलेली मागणी वाढली. २०२१ मध्येही ही मागणी होती, मात्र सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे कारचा पुरवठा पुरेसा होऊ शकला नव्हता. गेल्या वर्षी ही समस्या काही प्रमाणात दूर झाली. दरम्यान, सर्व औद्योगिक क्षेत्र कोविडशी संबंधित प्रतिबंधापासून पूर्ण मुक्त झाले. यामुळे रोजगार आणि उत्पन्न वाढल्यानेही कार विक्रीत मोठी वाढ झाली.
देशभरात इलेक्ट्रिक दुचाकी विक्री २८ टक्क्यांनी घटली डिसेंबरमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री २७.८८% घटून ५९५५४ झाली. त्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ७६१६२ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. यामुळे गेल्या वर्षी एप्रिल-डिसेंबरदरम्यान इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री सुमारे ५ लाख झाली. रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालयाच्या पोर्टल वाहनाच्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. नीती आयोगाने मार्च २०२३ पर्यंत १० लाख इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.
ईव्ही कंपन्यांचे ११०० कोटी रुपयांचे अनुदान अडकले ईव्ही दुचाकी बनवणाऱ्या अनेक कंपन्यांचे सुमारे ११०० कोटी रुपयांचे अनुदान सरकारने राेखले आहे. हीरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा ऑटोटेकचा यात समावेश आहे. ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल’चे संचालक- जनरल सोहिंदर गिल यांनी सांगितले, २०२२ च्या अखेरच्या दोन महिन्यांत टू व्हीलर ईव्हीची विक्री घटण्याची अनेक कारणे आहेत. अनुदान रखडणे हेही एक आहे.
किती मिळते अनुदान?
सरकार इलेक्ट्रिक दुचाकीवर १५००० रुपये प्रत्येक किलोवॅट अवर (केडब्ल्यूएच)चे अनुदान देते. घरगुती उपकरणांचा वापरासारख्या अनेक मापदंडांच्या हिशेबाने त्याची कमाल मर्यादा उत्पादन खर्चाच्या ४०% आहे. वाहनांच्या किरकोळ किमतीत हे अनुदान सामील असते. विक्रीचा पुरावा दिल्यानंतर सरकार ४५-९० दिवसांच्या आत कंपन्यांना ते अदा करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.