आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Swiggy Will Supply Groceries In 125 Cities Across The Country; There Will Be Supply Of Essential Goods

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:देशाच्या 125 शहरांत किराणा सामग्रीचा पुरवठा करेल स्विगी; अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एचयूएल, डाबर, विशाल मेगा मार्टसारख्या कंपन्यांशी भागीदारी

खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या स्विगीने किराणा आणि अत्यावश्यक वस्तूंचा घरोघरी पुरवठा करण्याची सेवा १२५ हून जास्त शहरांपर्यंत वाढवली आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की, याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय ब्रँड आणि किरकोळ कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. कंपनीने एका निवेदनात सांगितले की, त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, गोदरेज, डाबर, मॅरिको, विशाल मेगा मार्ट, सिप्लासारख्या बँ्रडसाोबत भागीदारी केली आहे. याशिवाय ग्राहकांच्या घरापर्यंत अनिवार्य वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी अनेक शहरांत तेथील विशेष स्टार्ससोबतही आघाडी केली आहे. स्विगीचे मुख्य परिचालन अधिकारी विवेक सुंदर म्हणाले, किराणा आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आमच्या दीर्घकालीन धोरणाचा आधीपासूनच भाग होता. आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी आम्ही हे तेजीने लागू केले आहे. त्यांनी सांगितले की, गल्ल्या-गल्ल्यात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची सोय होईल.

यासोबत कोरोना विषाणू संकटासारख्या आव्हानात्मक काळात त्यांना डिलिव्हरी करणाऱ्या सहकाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळेल. सुंदर म्हणाले, आम्ही या पातळीपर्यंत काम करू इच्छितो. कंपनीचे उद्दिष्ट टाळेबंदीच्या स्थितीत लोकांना घरात थांबण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्यापर्यंत वस्तूंचा पुरवठा करणे आहे.

जपानमध्ये विमानतळावरील प्रवाशांसाठी कार्डबोर्डचे हॉटेल, तपासणीही येथेच होते

टोकिओ : जपानच्या राजधानीनजीकच्या नरिता विमानतळावर  राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे. बॅगेज क्लेम एरियात कार्डबोर्डचे हॉटेल तयार केले आहे. विमानतळावर ज्यांची कोरोना विषाणूबाबत तपासणी केली जाते,असे हे प्रवासी आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार, कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर सहा तासांत येऊ शकतो. मात्र, यामध्ये विलंब होत असल्याने अनेकांना एक ते दोन दिवस विमानतळावर थांबावे लागते. येथे येणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे जवळपासची हॉटेल्सही भरले आहेत.

अमेरिका-इटलीहून अद्यापही येतात विमाने

सेंट्रल टोकियोपासून पूर्वेस ६० किमी अंतरावरील नरिता विमानतळावर उड्डाणांच्या संख्येतही वेगवान घट येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील एक धावपट्टी बंद केली आहे. मात्र, अद्यापही अमेरिका आणि इटलीसह विविध देशांतील विमाने येत आहेत. येथे विमानातून उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरून घरी जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...