आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:संगीतामुळे कुटुंबाने घराबाहेर केले, रस्त्यावर काढले आयुष्य; आता 7.55 लाख कोटींच्या कंपनीचे सीईओ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जपानी कंपनीचे सीईओ कोबायाशी यांच्या संघर्षाची कथा

मिन जियांग ली/काेमाकी इताे
घरातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर टोकियोतील रस्त्यांवर राहणारे ताई हेई कोबायाशी (३७) हे आपल्या जिद्दीवर यशस्वी उद्योजक झाले आहेत. आज ते ७.५५ लाख कोटींच्या सन अॅस्ट्रिक्स या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांची कंपनी बिझनेस मॉडेल व प्रॉडक्ट डिझाइन करते. घरंदाज घराण्यात जन्मलेल्या कोबायाशींनी उच्चशिक्षण घेऊन चांगले आयुष्य जगावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र कोबायाशींना संगीताचा छंद होता. एके दिवशी छंद जोपासायचा असेल तर घर सोड, असे वडिलांनी बजावून सांगितले. येथूनच कोबायाशींचा संघर्ष सुरू झाला. एका क्लबमध्ये त्यांना गायनाचे काम मिळाले. एकदा त्यांनी नोकरीची जाहिरात बघितली. त्यात अनुभवाचीही अट नव्हती. एका परीक्षेत पास होणे गरजेचे होते. गणित व तार्किक कौशल्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन ते पास झाले.

कंपनीने त्यांना प्रशिक्षण देऊन थेट सॉफ्टवेअर इंजिनिअर केले. आज ते त्याच कंपनीचे सीईओ आहेत. ते सांगतात की, कंपनीचे इंजिनिअर चांगले बिझनेस मॉडेल डिझाइन करू शकत नसल्याचे कंपनीचे संस्थापक माकाेटाे हिराई यांना वाटायचे. यासाठी त्यांनी २०१२ मध्ये व्हिएतनाममध्ये प्रतिभावंत इंजिनिअर्सचा शोध घेतला. २०१३ मध्ये त्यांनी फ्रामगिया इंकला सुरुवात केली. २०१९ मध्ये अॅस्ट्रिक्समध्ये विलीनीकरण केले. सध्या टोकियो स्टॉक एक्स्चेंजमध्ये नाेंदणीकृत असलेल्या अॅस्ट्रिक्स कंपनीची उलाढाल सुमारे ७.५५ लाख कोटी आहे. कोबायाशी आता पुन्हा एकदा कुटुंबासोबत राहत आहे.

संघर्षातून उभारली ७.४० लाख कोटींची कंपनी
अशीच एक कथा एअरबीएनबीची आहे. या कंपनीने शुक्रवारी ३,४७,८०० कोटींच्या समभागांसह वॉल स्ट्रीटमध्ये प्रवेश केला. या होम रेंटल स्टार्टअपची सुरुवात जाेए गेबिया, ब्राॅयन चेस्की आणि नाथन ब्लेजास्की या तीन मित्रांनी केली आहे. त्यांनी एअरबीएनबीडाॅटकाॅम वेबसाइट बनवली. एकेकाळी भाडे देण्यास असक्षम असलेल्या या तीन मित्रांनी आतापर्यंत ३० कोटी लोकांना भाडेतत्त्वावर जागा मिळवून दिली आहे. २००८ मध्ये ते ही कंपनी ११.१ कोटीत विकणार होते. मात्र ग्राहक मिळाले नाही. आज कंपनीचे मूल्य ७.४० लाख कोटी आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser