आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथंडीच्या सुटीत अनेक लोक आपल्या कारने सुटीवर जाण्याची योजना करत आहेत. प्रवास लांबचा असो किंवा जवळचा पुरेशी तयारी आणि सुरक्षेचे उपाय गरजेचे असतात. गाडीची सर्व्हिसिंग आणि इतर सामान याशिवाय वाहनाचे कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स करणे व त्यात गरजेचे अॅड-ऑन जोडणे तुमचा प्रवास चिंतारहित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
}इंजिन प्रोटेक्शन कव्हर| कोणत्याही वाहनाचा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो इंजिन. इंजिन प्रोटेक्शन कव्हरमुळे त्यात येणाऱ्या कोणत्याही खराबीमुळे किंवा रिप्लेसमेंटच्या महागड्या खर्चापासून बचाव तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अतिशय शांततेत प्रवास करू शकता. }२४ तास रोड-साईड असिस्टंस |प्रवासादरम्यान कार बिघडणे किंवा अपघात झाल्यास विमा कंपनी मदत करते. त्यात वाहनाला गॅरेजपर्यंत नेणे, प्रवास करणाऱ्या लोकांना पर्यायी व्यवस्था करून देणे, वैद्यकीय सुविधा दिली जाते. }इमर्जन्सी हॉटेल व ट्रान्सपोर्ट कव्हर | वाहन खराब झाल्यास एखाद्या हॉटेलमध्ये उतरावे लागल्यास विमा कंपनी सर्व खर्च उचलते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.