आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्य साखळीवर परिणाम:कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीवर उपाययोजना करा

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिधान निर्यातदारांची संघटना एईपीसीने बुधवारी सरकारला कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले कारण सततच्या वाढीमुळे उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीवर परिणाम झाला आहे.

मार्चमध्ये प्रति किलाेग्रॅम ३७६ रुपये असलेली सूती धाग्याची किंमत एप्रिलमध्ये ४०६ रुपये आणि आत्तापर्यंत ४४६ रुपये प्रति किलोवर गेली असल्याचे अॅपरल एक्स्पाेर्य प्रमाेशन काैन्सिल या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.

सुताच्या किमती १८ महिन्यांपूर्वी २०० रुपये प्रति किलोच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत, असे त्यात म्हटले आहे. वस्त्रोद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या सुती धाग्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन वार्षिक निर्यात लक्ष्य गाठण्याच्यादृष्टीने एईपीसीने सरकारच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. २०२२-२३ वर्षासाठीचे २० अब्ज डाॅलर्सचे तयार कपडे निर्यातीचे लक्ष्य गाठण्यास मदत होऊ शकेल असे पारिषदेने म्हटले आहे.

एईपीसीचे अध्यक्ष नरेंद्र गोयंका म्हणाले की, निर्यात ऑर्डर हातात असल्याने उद्योग आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तथापि, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यने संपूर्ण परिधान मूल्य शृंखलेवर परिणाम झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...