आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे बहुतांश गुंतवणूकदार आणि व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. काही कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठी घसरण झाली आहे, पण काही प्रवर्तकही त्याचा फायदा घेत आहेत. या वर्षात आतापर्यंत डझनभर कंपन्यांच्या प्रवर्तकांनी स्वतःच्या कंपनीचे ५० कोटी ते १२०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस. रंगनाथन यांच्या म्हणण्यानुसार, असे नाही की या प्रवर्तकांनी त्यांचे शेअर्स आधी विकले होते आणि आता ते विकत घेत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी आपले शेअर्स विकले नाहीत. ते म्हणाले की एल अँड टी फायनान्सच्या प्रवर्तकांनी २८ मार्च रोजी एकाच दिवसात २% (सुमारे ६ कोटी रुपये) शेअर्स खरेदी केले होते. यामुळे त्या दिवशी स्टॉक २०% च्या वरच्या सर्किटला गेला होता.
गुंतवणूकदारांसाठी खास संकेत
रंगनाथन यांच्या मते, हे भविष्यात चांगली कामगिरी करणारे समभाग असू शकतात. “सध्या महागाई शिगेला पोहोचली आहे आणि जगभरात व्याजदर वाढवले जात आहेत. ही कठीण वेळ आहे.
कंपनी प्रवर्तकांची खरेदी कंपनी प्रमोटर खरेदी एचसीएल टेक 1,197 एलअँडटी फायनान्स 542 बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट 404 श्रीराम सिटी युनियन फायनान्स 271 ग्रासिम इंडस्ट्रीज 203 महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह 200 गोदरेज अॅग्रोव्हेट 197 श्रीराम ट्रान्सपाेर्ट फायनान्स 117 महाराष्ट्र सिमलेस 71 (समभाग खरेदी काेटी रुपयांत, स्रोत : बीएसई)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.