आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Talks With Taiwanese Supplier Wistron Corp, If The Deal Is Finalized, Tata Will Become The First Indian Company To Make An IPhone

टाटा बनवणार iPhone:तैवानचे सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा, करार निश्चित झाल्यास टाटा ठरेल iPhone बनवणारी पहिली भारतीय कंपनी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूह भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी एपल इंकच्या तैवानी पुरवठादार विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत आहे. हा संयुक्त उपक्रम भारतात आयफोन असेंबल करेल. टाटांना याद्वारे तंत्रज्ञान निर्मितीमध्ये एक अग्रगण्य कंपनी म्हणून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हा करार यशस्वी झाल्यास, आयफोन तयार करणारी टाटा ही पहिली भारतीय कंपनी ठरेल. सध्या, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन भारत आणि चीनमध्ये आयफोन असेंबल करतात. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे.

भारतीय कंपनीने आयफोन बनवायला सुरुवात केली तर चीनला ही मोठी टक्कर मिळेल. कोविड लॉकडाऊन आणि अमेरिकेसोबतच्या राजकीय तणावामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील चीनचे वर्चस्व धोक्यात आले आहे. वाढत्या भू-राजकीय जोखमीच्या वेळी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ऍपल आयफोन निर्मितीसाठी केवळ चीनवर अवलंबून राहू इच्छित नाही.

डील अजून फायनल व्हायची आहे

शेअर होल्डिंगसह इतर तपशील आणि कराराची रचना अद्याप निश्चित झालेले नाही. याच्याशी संबंधित सूत्राने सांगितल्यानुसार, टाटा आयफोन उत्पादनासाठी विस्ट्रॉनच्या इंडिया ऑपरेशनमध्ये इक्विटी खरेदी करू शकतात किंवा कंपन्या नवीन असेंबली प्लांट स्थापन करू शकते. या दोन्ही गोष्टींची अंमलबजावणीही होऊ शकते. ऍपल स्थानिक कंपन्यांसोबत काम करण्यासाठी ओळखले जाते जेथे ते मॅन्युफॅक्चरिंग बेस स्थापित करते.

आयफोनचे उत्पादन 5 पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट
सूत्राने सांगितल्यानुसार, नवीन वेंचरचा उद्देश भारतात विस्ट्रॉन-निर्मित आयफोनची संख्या पाच पटीने वाढवणे आहे. ही भागीदारी झाली तर ती केवळ आयफोन निर्मितीपुरती मर्यादित राहणार नाही. हा मॅन्युफॅक्टरिंग बिझनेस स्मार्टफोनच्याही पलीकडे नेला जाईल. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, कंपनीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक उत्पादन हे मुख्य फोकस क्षेत्र आहेत.

तोट्यात असलेल्या विस्ट्रॉनला मजबूत पार्टनर मिळेल
टाटा समूहाचा व्यवसाय बहुतांशी सॉफ्टवेअर, स्टील आणि कार या क्षेत्रांमध्ये आहे. परंतु दक्षिण भारतात आयफोनसाठी चेसिस घटकांचे उत्पादन सुरू करून स्मार्टफोन सप्लाय चेनसारखी सुरुवातीची पावले उचलली आहेत. टाटाच्या पाठिंब्यामुळे तोट्यात चाललेल्या विस्ट्रॉनच्या भारतीय व्यवसायासाठी एक मजबूत स्थानिक भागीदार मिळेल. विस्ट्रॉनने 2017 मध्ये भारतात आयफोन बनवण्यास सुरुवात केली. ताइपेस्थित कंपनी सध्या कर्नाटकातील त्यांच्या प्लांटमध्ये आयफोन असेंबल करते.

चीनमध्ये आयफोनचे सर्वात मोठे उत्पादन
बहुतेक आयफोन चीनमध्ये तयार होतात. Apple त्यांच्या फॅक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंत्राटी उत्पादकांना भाग पुरवते आणि ते उत्पादक आयफोन तयार करण्यासाठी ते एकत्र करतात. Apple ने 2017 मध्ये iPhone SE सह भारतात iPhones बनवायला सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...