आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट सॉलिटेअर कलेक्शन सादर:तनिष्कने सादर केला ‘सेलेस्ट x सचिन तेंडुलकर’ सॉलिटेयर संग्रह

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहाचा एक भाग असलेल्या तनिष्कने ‘सेलेस्टे x सचिन तेंडुलकर’ हे उत्कृष्ट सॉलिटेअर कलेक्शन सादर केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा उत्सव साजरा करत, त्यांच्या उल्लेखनीय यशाचा आनंद साजरा करत, तनिष्कने अत्यंत काळजीपूर्वक, अचूकतेने आणि परिपूर्णतेने हा संग्रह तयार केला आहे.हा १०० मर्यादित संस्करण सॉलिटेअर संग्रह स्वतः सचिन तेंडुलकरची वैशिष्ट्ये, गुण आणि कर्तृत्वावर आधारित आहे, हा संग्रह सचिन तेंडुलकरच्या गुणांचे आणि कर्तृत्वाच्या शिखराचे प्रतिनिधित्व करतो.

या कलेक्शनच्या प्रत्येक तुकड्यात हँडक्राफ्टेड हिऱ्यांची चमक आणि रंग दिसून येतो. या उबेर-प्रिमियम कलेक्शनमधील दागिने डायमंड कटिंग तंत्रज्ञानाने बनवलेले आहेत, जे किमान सहा पेटंट्सद्वारे संरक्षित आहेत, हा सॉलिटेअर हिरे कटिंगच्या क्षेत्रातील अभूतपूर्व नवकल्पनाचा परिणाम आहे.