आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Tanishq Takes Down 'Ekatvam' Campaign Advertisement Of Hindu Muslim Couple After Social Media Backlash, Shashi Tharoor Slams Trolls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BoycottTanishq:हिंदू मुलीला मुस्लिम सून दाखवल्यानंतर तनिष्कची जाहिरात वादात, लव जिहादच्या समर्थनाचा आरोप; ब्रांडच्या समर्थनार्थ आले नेते-अभिनेते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजर्स विचारत आहेत - मुस्लिमांच्या घरी नेहमीच हिंदू सून का दाखवण्यात येते?
  • वाद वाढल्यानंतर तनिष्कने व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरुन काढून टाकला आहे

टाटा ग्रुपचे प्रसिद्ध ज्वेलरी ब्रांड तनिष्क आपल्या नवीन जाहिरातीसाठी वादात सापडले आहे. ब्रांडला सोशल मीडियावर वाईट पध्दतीने टीकेचा सामना करावा लागत आहे. खरेतर फेस्टिव्ह सिजन जवळ येत आहे. अशा काळात तनिष्कने आपल्या प्रमोशनसाठी नवीन जाहीरात जारी केली आहे. या जाहिरातीचा प्लॉट इंटरकास्ट मॅरेजवर आधारित आहे.

जाहिरातीमध्ये हिंदू मुलीची मुस्लिम मुलासोबत लग्न दाखवण्यात आले आहे. यानंतरपासून ट्विटरवर तनिष्कला ट्रोल करणे सुरू झाले आहे. ट्विटरवर #BoycottTanishq सोबतच ज्वेलरी ब्रांडचा विरोध केला जात आहे. यासंबंधी आम्ही तनिष्कसोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र वाद वाढल्यानंतर तनिष्कने व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरुन हटवला आहे.

या जाहिरातीत काय?
तनिष्कच्या या प्रमोशनल जाहिरातीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम कुटुंबाच्या सूनेच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हिंदू मुलीचे मुस्लिम घरात लग्न झाले आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू कल्चर लक्षात घेता मुस्लिम कुटुंब सर्व प्रथा-परंपरा हिंदू धर्मानुसार करत आहे.

जाहिरातीच्या शेवटी ती प्रग्नेंट महिला आपल्या सासूला विचारते, 'आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना?' यावर तिची सासू उत्तर देते की, 'पण मुलीला खूश करण्याची प्रथा तर सर्वच घरात असते ना?' व्हिडिओमध्ये हिंदू-मुस्लिम कुटुंबाची एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी आहे
सोशल मीडियावर ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे आणि लोक त्याविषयी बर्‍याच प्रकारे बोलत आहेत. कोणी असे म्हणत आहे की ते लव्ह जिहादला प्रोत्साहन देते तर कोणी हिंदूविरोधी असल्याचे म्हणत आहेत. लोक म्हणतात की कोणतीही जाहिरात कोणत्याही धर्म किंवा जातीशिवाय तयार केली जात नाही.

जाति धर्म समोर आणणे आवश्यक आहे का? एवढेच नाही तर एका यूजरने लिहिले की, पण आपण प्रत्येक ठिकाणी एक हिंदू सूनच का पाहतो. मुस्लिम सून का नाही दाखवली जात? तर 'एकत्वम' च्या नावाने तयार करण्यात आलेल्या या जाहीरातीवर अनेकांनी आक्षेप घेत लव्ह-जिहादला प्रोत्साहन देणारे म्हटले आहे. ट्विटरवर तनिष्कच्या विरोधात मोहिम सुरू झाली आणि लोक तनिष्कचे दागिणे खरेदी करु नका असे म्हणत याला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत.

शशी थरुर यांनी व्यक्त केली नाराजी
तनिष्कच्या या जाहीरातीवर होणाऱ्या विरोधावर काँग्रेसचे वरिष्ठ नेता शशी थरुर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केले की, हिंदुत्व ब्रिगेडने हिंदुत्व-मुस्लिम एकतेला सुंदर पध्दतीने दाखवणाऱ्या या जाहीरातीमुळे तनिष्क बायकॉट करण्याची मागणी केली आहे. जर हिंदुत्व-मुस्लिमच्या एकतेनेर त्यांना एवढी अडचण आहे तर पूर्ण जगगात हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचा प्रतिक भारताचे बायकॉट का करत नाही. तर काँग्रेस नेता अभिषेक सिंघवी यांनीही यावर ट्विट करत बायकॉट करण्याची मागणी करणाऱ्यांवर टीका केली आहे. तर अनेक प्रसिद्ध अभिनेताही ब्रांडच्या समर्थनात आहेत आणि त्यांनी टीका करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser