आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Tar Kumpan Yojana Application Process; Farmers Subsidy Scheme | Government Scheme

शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना:वन्यप्राण्यांपासून पीकांचे होईल संरक्षण, जाणून घ्या- अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता काय?

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. चला तर जाणून घेऊया की, तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो. त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया...

तार कुंपन योजनेचा उद्देश काय
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपन करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे जंगली जनावरांपासून, वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टळू शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिले जाते.

तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी वाचा अटी

  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
  • शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
  • सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
  • शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
  • त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
  • तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.
  • तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.

तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा, आवश्यक कागदपत्रे

तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे. विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • गाव नमुना ८ अ
  • जात प्रमाणपत्र
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

युटिलीटी संदर्भातील ही महत्त्वाची बातमी

436 रुपयात मिळते 2 लाखांचे विमा संरक्षण : जाणून घ्या- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची प्रक्रिया

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना नेमकी आहे तरी काय, या योजनेचा लाभ कसा घेता येतो, त्यासाठी काय पात्रता लागते, यासह सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. जेणेकरून अनेकांना या योजनेत सहभागी होता येईल. - येथे वाचा संपूर्ण बातमी

काय असते 'आभा' हेल्थ कार्ड:याचा नेमका काय होतो फायदा, ऑनलाईन ABHA कार्ड कसे काढणार; जाणून घ्या सविस्तर

आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. चला तर आज जाणून घेवूया, आभा हेल्थ कार्ड नेमकं काय असते.- येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...