आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे रणक्षेत्र:पारंपरिक पोशाख बाजारपेठेत टाटा-बिर्ला-अंबानींमध्ये स्पर्धा, 1 लाख कोटी बाजाराच्या नियंत्रणासाठी चढाओढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात लग्न-समारंभ, सणासुदीनिमित्त घातल्या जाणाऱ्या पारंपरिक पोशाखाच्या(लहंगा, शेरवानी, डिझायनर साडी, कुर्ते आदी) व्यवसायातील बहुतांश हिस्सा कायम असंघटित आणि छोटे-मध्यम डिझायनर्स, ब्रँड आणि मॅन्युफॅक्चरर्सच्या हातात राहिला आहे. मात्र, आता चित्र बदलत आहे. देशाच्या सर्वात मोठ्या उद्योग घराण्यांत समाविष्ट टाटा समूह, आदित्य बिर्ला समूह आणि मुकेश अंबानीच्या रिलायन्स रिटेलने या बाजारात उडी घेतली आहे. वेस्टसाइडद्वारे आधीपासूनच एथनिक विअरमध्ये व्यवसाय करत असलेला टाटा समूह तनेरा रेंजच्या माध्यमातून या श्रेणीत आपल्या अस्तित्वास आणखी बळकटी देत आहे.

दुसरीकडे, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल हा आतापर्यंत व्हॅन ह्युसेन, पीटर इंग्लंडसारख्या ब्रँडच्या माध्यमातून पाश्चिमात्त्य कपड्यांवर लक्ष देत होता. तोही आता सब्यसाची, तरुण तहिलियानी आणि शंतून आणि निखिलसारख्या डिझायनर ब्रँडमध्ये हिस्सेदारी खरेदी करून इथनिक विअरमध्ये आपले अस्तित्व नोंदवत आहे. रेमंडनेही आपली स्थानिक इथनिक रेंज स्वतंत्ररीत्या लाँच केली आहे. याशिवाय रिलायन्स ग्रुपनेही आपली रिटेल चेन ट्रेंड्सच्या माध्यमातून अवांत्रा बाय ट्रेंड्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. फॅशन रिटेल क्षेत्रातील कंपनी टेक्नोपॅकचे सीनियर पार्टनर अमित गुगनानी यांच्यानुसार, भारताचे इथनिक वेअर मार्केट सुमारे १ लाख कोटींचे आहे. यामध्ये ८५%ंपेक्षा जास्त हिस्सेदारी महिलांच्या श्रेणीची आहे. १० टक्के हिस्सेदारी मुले आणि ५ टक्के हिस्सेदारी पुरुषांची आहे.

महाग व एक्सक्लुझिव्ह रेंज लाँच करेल टाटा समूह
इथनिक वेअर श्रेणीत उतरण्याचा आमचा उद्देश डिझायनर क्लोथिंग आणि क्वॉलिटी देणे आहे. आम्ही आपल्या पोर्टफोलिओत डिझायनर कुर्ता आणि ब्लाइजसारख्या बाबींचाही समावेश करत आहेत. आमच्या ब्रँडच्या मिळती-जुळती संकल्पना महाग व एक्सक्लुझिव्ह रेंज सादर करणे ही आहे. - रघुवर सेठ, मार्केटिंग हेड, तनेरा

बातम्या आणखी आहेत...