आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा कंझ्युमर आणि बिस्लेरीतील डीलची चर्चा मध्येच थांबली आहे. याचे कारण मूल्य सांगितले जात आहे. बिस्लेरीच्या मालकांना या डीलमधून सुमारे 1 अब्ज डॉलर्स हवे आहेत. बिस्लेरी भारतातील सर्वात मोठी बाटलीबंद पाण्याची कंपनी आहे. रमेश चौहान यांनी ही कंपनी 1969 मध्ये सुमारे 4 लाख रुपयांत खरेदी केली होती. ब्लूमबर्गने याविषयीचा एक अहवाल प्रकाशित केला आहे.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये बातमी आली होती की सॉफ्ट ड्रिंक ब्रँड थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का कोका कोलाला विकल्यानंतर सुमारे तीन दशकांनी रमेश चौहान बिस्लेरी इंटरनॅशनल विकणार आहेत. म्हटले जात होते की 82 वर्षीय चौहान यांच्याकडे बिस्लेरी पुढे नेण्यासाठी उत्तराधिकारी नाही. मुलगी जयंतीला व्यवसायात तेवढा रस नाही.
27 वर्षांच्या वयात मिनरल वॉटर विकणे सुरू केले
मिनरल वॉटर ब्रँड बिस्लेरी भारतात लोकप्रिय बनवणाऱ्या रमेश चौहान यांचा जन्म 17 जून 1940 रोजी जयंतीलाल आणि जया चौहान यांच्या पोटी मुंबईत झाला. त्यांचे मित्र त्यांना आरजेसी या नावाने संबोधतात. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि बिझनेस मॅनेजमेन्ट केले आहे. नेहमी वेळेच्या पुढे राहण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चौहान यांनी 27 वर्षांचे असतानाच भारतीय बाजारात बाटलीबंद मिनरल वॉटर सादर केले होते.
पारले एक्सपोर्टसने 1969 मध्ये इटलीतील एका व्यावसायिकाकडून बिस्लेरीची खरेदी करत भारतात मिनरल वॉटर विकायला सुरुवात केली होती. 50 वर्षांपेक्षा दीर्घ करिअरमध्ये चौहान यांनी बिस्लेरीला मिनरल वॉटरमधील भारताचा टॉप ब्रँड बनवले. चौहान यांनी प्रीमियम नॅच्युरल मिनरल वॉटर ब्रँड वेदिकाही बनवला आहे. याशिवाय थम्सअप, गोल्ड स्पॉट, सिट्रा, माझा आणि लिम्कासारखे अनेक ब्रँड बनवणारेही चौहानच आहेत.
जयंतींनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे शिक्षण घेतले आहे
रमेश चौहान यांची कन्या जयंतीने हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे शिक्षण घेण्यासाठी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन अँड मर्केंडायझिंगमध्ये अॅडमिशन घेतले. नंतर त्यांनी इन्स्टिट्युटो मारंगोनी मिलानोत फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचेही शिक्षण घेतले.
जयंतींनी 24 व्या वर्षी बिस्लेरी जॉईन केले होते. त्यांनी दिल्ली कार्यालयाचा पदभार सांभाळला. तिथे त्यांनी जमिनीवरून काम सुरू केले. त्यांनी कारख्यानेचे नुतनीकरण आण ऑटोमेशन केले. 2011 मध्ये त्यांनी मुंबई कार्यालयाची जबाबदारी घेतली. न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसह जुन्या प्रॉडक्टचे ऑपरेशन स्ट्रिमलाईन करण्यातही त्या सहभागी राहिल्या. जयंती यांना फोटोग्राफी आणि प्रवासाचाही छंद आहे. सध्या त्या कंपनीत उपाध्यक्ष आहेत.
ही बातमीही वाचा...
फॅब इंडिया कंपनीने 4000 कोटींचा आयपीओ घेतला मागे:शेअर बाजारात हिडेंगबर्गचा अहवालाचा परिणाम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.