आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप गिअर:टाटा मोटर्सच्या विक्रीत 67% वाढ, मारुतीची दुप्पट निर्यात, बहुतांश कंपन्यांच्या विक्रीत वाढ, महिंद्राच्या विक्रीत 65% वाढ

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळापासून संकटातून जात असलेल्या देशातील ऑटोमोबाइल उद्योगाच्या विक्रीच्या दृष्टीने मार्च महिना मजबूत वाढीचा महिना होता. बहुतांश कंपन्यांच्या कार विक्रीत तेजी आली. टाटा मोटर्सने तिमाही आणि मासिक आधारावर विक्रीचे सर्व विक्रम केले आणि देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची निर्यात दुप्पट झाली.

गेल्या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सच्या विक्रीत ६७% वाढ झाली, तर आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत विक्रीत ४७ % वाढ झाली. मार्चमध्येही टाटा मोटर्सच्या विक्रीत वार्षिक आधारावर ४३% वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची विक्री २०२१-२२ या आर्थिक वर्षात केवळ ३% वाढली, परंतु या कालावधीत कंपनीची निर्यात दुप्पट झाली. मार्चमध्ये मारुती सुझुकीच्या कार विक्रीत वार्षिक आधारावर ८.४४% ने घट झाली, परंतु मासिक आधारावर २% वाढ झाली. सर्वाधिक गाड्या मारुतीने विकल्या आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राच्या कारच्या विक्रीत गेल्या महिन्यात ६५% वाढ झाली. परंतु तिसरी सर्वात मोठी कार कंपनी ह्युंदाईच्या विक्रीत १५% घट झाली आहे. दुसरीकडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने पाच वर्षांत सर्वाधिक गाड्यांची विक्री केली. कंपनीची मार्चमध्ये विक्री १४% वाढली. किया इंडियाने मार्चमध्ये १८ % वाढ नोंदवली आहे. स्कोडा इंडियाने एकाच महिन्यात ५,६०८ कार विकल्या असून त्या दोन दशकांतील सर्वाधिक आहे.

सेमी कंडक्टरचे आव्हान कायम टाटा मोटर्सने आव्हानात्मक वर्षात अनेक नवे विक्रम रचले आहेत. सेमी कंडक्टरची स्थिती अद्याप अनिश्चित आहे, परंतु आम्ही सतत बदलणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. - शैलेश चंद्र, एमडी, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स

महिंद्रा अँड महिंद्राची वेगवान वाढ, मारुतीची अडचणींवर मात

कंपनी मार्च-21 मार्च-22 वाढ% 2020-21 2021-22 वाढ टाटा मोटर्स 29,654 42,293 43% 2,22,025 3,70,372 67% मारुती सुझुकी 146,203 133,861 -8% 1,293,840 1,331,558 3% एम अँड एम 16,700 27603 65% 157216 2,25,895 44% टोयोटा 15,001 17,131 14% 93,134 1,23,770 33%

बातम्या आणखी आहेत...