आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Tata Motors | Share Hike Update | Tata Car | Ratan Tata | Tata Motors Share Price

बाजार:टाटा मोटर्सचे शेअर 500 वर; 700 रुपयांचा टप्पा गाठणार का? कंपनीकडून महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा मोटर्सच्या समभागांनी (टाटा मोटर्स स्टॉक) 500 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी सकाळी या स्टॉकने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये गत महिनाभरापासून जोरदार तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स वर्षभरात 22 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. विशेषतः चालू वर्षात आतापर्यंत त्यात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनी 6 वर्षांनंतर आपल्या भागधारकांना लाभांश घोषित करू शकते. यापूर्वी, 2016 मध्ये टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश जारी केला होता.

बोर्डाच्या बैठकीत निर्णय शक्य

एक्सचेंजनुसार, टाटा मोटर्सच्या बोर्डाची बैठक 12 मे रोजी होणार आहे. त्यात लाभांशावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. पण कंपनीकडून याविषयी कोणतेही अधिकृत निवेदना करण्यात आले नाही. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या फार तेजीत आहेत.

स्टॉकमध्ये जोरदार तेजी

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी सांगितले की, स्टॉक उत्कृष्ट तेजीमध्ये दिसून येत आहे. त्या म्हणाल्या की, समभागाने दैनिक चार्टवर सममितीय त्रिकोण ब्रेकआउटसह 450 रुपयांच्या वर ब्रेकआउट दिला आहे. त्या म्हणाल्या - 515 रुपयांच्या पातळीजवळ थोडासा रेजिस्टेंस आहे. 515 रुपयांवर क्लोज झाल्यानंतर शेअर 550-600 रुपयांच्या पातळीवर जाील. तर 450 रुपयांचा स्तर दीर्घ मुदतीसाठी मजबूत आधार म्हणून काम करेल.

शेअर 700 रुपयांच्या पुढे जाणार

व्हेंचुरा सिक्युरिटीजचे रिसर्च हेड विनीत बोलिंजकर म्हणाले की, टाटा मोटर्स 12 मे 2023 रोजी आपले Q4FY23 निकाल जाहीर करेल. गुंतवणूकदार महसूल व नफा वाढण्याची वाट पाहत आहेत. कंपनीने आपल्या JLR, कमर्शियल व्हेईकल व पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये अपेक्षेपेक्षा चांगल्या विक्रीचे आकडे नोंदवलेत. या आधारावर मार्च तिमाहीत कंपनीचे निकाल उत्कृष्ट राहतील असा अंदाज आहे. बाजाराचे फोकस या सकारात्मक घडामोडींवर आहे. त्यामुळे समभागांमध्ये तेजी दिसून येत आहे. विनीत बोलिंजकर म्हणाले की, आम्ही FY26 साठी टाटा मोटर्सच्या स्टॉकची टार्गेट प्राइज 715 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

मजबूत निकालाची शक्यता

टाटा मोटर्सच्या बोर्ड सदस्यांची बैठक 12 मे 2023 रोजी होणार आहे. त्यात 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या लेखापरीक्षित आर्थिक निकालांना (स्टँडअलोन आणि एकत्रित) विचार करून मंजुरी दिली जाईल. एमके ग्लोबल फायनान्शिअलच्या विश्लेषकांनी सांगितले की, विक्रीच्या आकडेवारीत वाढ झाल्यामुळे टाटा मोटर्सचा एकत्रित महसूल 37 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.