आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:टाटा सन्स सूचिबद्ध कंपन्यांची संख्या 29 वरून 15 करणार

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स आगामी महिन्यात ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांची संख्या २९ वरून कमी करून १५ करणार अाहे. कंपनीने हा निर्णय व्यवसाय मजबूत करण्यासाठी केला आहे. यामुळे मोठ्या कंपन्यांना गुंतवणूक करण्यावर फोकस करणे सोपे जाईल आणि या कंपन्या बाजारातील स्पर्धेचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतील. याशिवाय टाटा ग्रुपचा कॅश फ्लोदेखील चांगला होईल. टाटा समूहाच्या २९ सूचिबद्ध कंपन्यांव्यतिरिक्त, समूहाच्या १० औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ६० असूचिबद्ध कंपन्या आणि शेकडो उपकंपन्या आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह कॉर्पोरेट रचनेत सुधारणा करण्याच्या दिशेने काम करत आहे. गेल्या आठवड्यात समूहाने आपल्या सात उपकंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन करण्याची घोषणा केली.