आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Adani Power's Profit Jumps 16 fold To Rs 4,780 Crore, Tata Steel's Profit Jumps 37 Percent, IndiGo's Loss Narrows By 66 Percent

तिमाही निकाल:अदानी पॉवरचा नफा 16 पटीने वाढून 4,780 कोटींवर, Tata Steel चा नफा 37 टक्के, इंडिगोचा तोटा 66 टक्के कमी

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी पॉवरने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीचे निकाल बुधवारी जाहीर केले आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यात कंपनीचा नफा 1,619 टक्के वाढून 4,780 कोटींवर गेला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या यात तीन महिन्यात ते 278 कोटी रुपये होते. अर्थात एका वर्षात कंपनीच्या नफ्यात 16 पटीने वाढ झालेली आहे.

उत्पन्नातही 115 टक्क्यांनी वाढ
कंपनीचे एकूण उत्पन्न 15,509 कोटी झालेले आहे. जे साधारणतः एका वर्षांपूर्वी जून तिमाहीत 7,213.21 कोटी रूपयांवर होते. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात 115 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

आज शेअर 3.49 टक्क्यांनी वाढला
अदानी पॉवरच्या शेअर्सबद्दल विचार केला तर बुधवारी त्यात मोठी वाढ झालेली दिसून आली. आज तो 11.45 रूपयांवर (3.49 टक्के) वाढून 340 रुपयांवर गेला होता. त्याचवेळी गेल्या 1 महिन्यात त्यात 29.92 टक्के वाढ झाली आहे.

अदानी विल्मरच्या नफ्यात 10.18 टक्के वाढ
अदानी विल्मारला एप्रिल-जून या तीन महिन्यात 193.59 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 10.18 टक्क्यांनी झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचा नफा 175.70 कोटी होता. दुसरीकडे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, ऑपरेशन्समधून एकत्रित महसुलात चांगली वाढ नोंदवली गेली आहे. 30.23 टक्क्याने वाढून 14,731.62 कोटी रूपयांवर गेली आहे. त्याचवेळी गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत महसूल 11,311.97 कोटींवर होता.

इंडिगो एअरलाईन तोटा कमी झाला
इंडिगो एअरलाइन चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशननेही बुधवारी आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून-22) निकालही जाहीर केले आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, जून तिमाहीत तिचा निव्वळ तोटा जवळपास दोन तृतीयांश कमी होऊन 1,064 कोटीवर झाला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 3,174.2 कोटींवर होता. होता. इंडिगोचा एकत्रित महसूल जून तिमाहीत वार्षिक 310.70% वाढून रु. 12,855.3 कोटी झाला.

टाटा स्टीलचा नफा 37 टक्क्यांनी वाढला
टाटा स्टीलने मंगळवारी आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत टाटा स्टीलच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 9,835.12 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी याच कालावधीत 7,161.91 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. कंपनीच्या बोर्डाने 10 रुपये दर्शनी मूल्याचा शेअर प्रत्येकी 1 रुपयांच्या 10 शेअर्समध्ये म्हणजेच स्टॉक स्प्लिटमध्ये विभाजित करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

महसूलात 39 टक्क्यांनी वाढ
टाटा स्टीलच्या महसूलात 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 69,615.70 कोटी रुपये झाले आहे. जे एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत 50,300.55 कोटी रूपये होते. टाटा स्टीलचा एकूण खर्च आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत वाढून 57,635.79 कोटी झाला आहे. जो एका वर्षापूर्वी 2020-21 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत 40,102.97 कोटीवर होता.

बातम्या आणखी आहेत...