आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:तंत्रज्ञान कंपन्या आर्थिक क्षेत्रात प्रवेश करून जोखीम वाढवतात : दास

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल प्लॅटफॉर्म, सर्च इंजिन आणि ई-कॉमर्स दिग्गज आर्थिक व्यवसायात प्रवेश करत असल्याने, निरोगी स्पर्धा आणि डेटा गोपनीयतेबद्दल प्रश्न निर्माण होतील. किमान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे तरी असेच मत आहे. शुक्रवारी एका परिषदेत बोलताना दास म्हणाले की, मोठ्या टेक कंपन्यांनी आर्थिक व्यवसायात प्रवेश केल्यामुळे गरजेपेक्षा जास्त कर्ज वितरण आणि ते न फेडल्यामुळे डिफॉल्टची प्रकरणे वाढू शकतात. ते म्हणाले की, ई-कॉमर्स कंपन्या, सर्च इंजिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्या स्वत:च्या स्तरावर किंवा भागीदारीद्वारे आर्थिक सेवा देऊ केल्या आहेत. हा एक धोकादायक कल आहे. दास यांच्या मते, मोठ्या टेक कंपन्यांशी संबंधित एक नैसर्गिक धोका जोडलेला असतो. त्याचे योग्य मूल्यमापन करावे लागेल, जेणेकरून भविष्यातील या समस्येला योग्य प्रकारे सामोरे जाता येईल.

रिझर्व्ह बँक डिजिटल कर्ज देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी
दास म्हणाले की, बँकिंग क्षेत्र मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. केंद्रीय बँक लवकरच डिजिटल कर्ज देणारी इकोसिस्टिम सुरक्षित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. हे प्लॅटफॉर्म सहसा किरकोळ कर्ज देतात, त्यामुळे सामान्य लोकांच्या हितासाठी असे करणे आवश्यक आहे.

दर वाढवण्यास उशीर नाही, ही आमची रणनीती होती दास म्हणाले, कोविड महामारीच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण समितीने (एमपीसी) जाणीवपूर्वक महागाई सहन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे करणे ही काळाची गरज होती, अन्यथा परिणाम भयंकर झाले असते. धोरणात्मक दर वाढवण्यात घाई न करणे ही चूक नसून रणनीतीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...