आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्णय:टेलीकॉम कंपन्यांना एजीआरची रक्कम फेडण्यासाठी मिळाली 10 वर्षांची मुदत- सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेलीकॉम कंपन्यांनी पैसे फेडण्यासाठी मागितली होती 15 वर्षांची मुदत

टेलीकॉम कंपन्यांना आता अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर)ची रक्कम फेडण्यासाठी 10 वर्षांची मुदत मिळाली आहे. ही मुदत 1 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. आतापर्यंत टेलीकॉम कंपन्या यासाठी 15 वर्षांचा वेळ मागत होत्या. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी निर्णय देताना म्हटले की, यादरम्यान पेमेंटमध्ये उशीर झाला किंवा डिफॉल्ट झाले, तर यावर व्याज आणि पेनाल्टी लागेल.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, एजीआरची एकूण रकमेचा 10% भाग 31 मार्च 2021 पर्यंत भरावा लागेल. यासोबतच दरवर्षी 7 फेब्रुवारीला टेलीकॉम कंपन्यांना एजीआरच्या ठरलेल्या रकमेचे पेमेंट करावे लागेल. कोर्टाने निर्णयासोबत हेदेखील म्हटले की, या रकमेचे व्हॅल्यूएशन केले जाणार नाही. म्हणजेच, जी आज रक्कम ठरली आहे, तीच भरावी लागेल.

वोडाफोन आयडियावर 50,400 कोटींची बाकी

यापूर्वी सरकार टेलीकॉम कंपन्यांना एजीआरची रक्कम फेडण्यासाठी 20 वर्षांची मुदत देण्याबाबत विचार करत होते. एजीआरची सर्वात जास्त बाकी वोडाफोन आयडियावर आहे. वोडाफोन आयडियावर एजीआरची एकूण 50 हजार 400 कोटींची बाकी आहे. तसेच, भारती एअरटेलवर 26 हजार कोटी बाकी आहे.