आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Telecommunication Companies Should Be Reimbursed Up To 203% Even After The AGR Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूरसंचार क्षेत्र:‘एजीआर'च्या समस्येनंतरही दूरसंचार कंपन्यांचा २०३% पर्यंत परतावा

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपापसातील स्पर्धा कमी झाल्याने कंपन्यांचा नफा वाढला : तज्ज्ञ

एजीआरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतरही लॉकडाऊनमध्ये दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात डेटा वापरात वाढ झाल्याने आणि कंपन्यांमधील स्पर्धा कमी झाल्याने नफादेखील वाढला आहे. यामुळे के‌‌वळ अडीच महिन्यांमध्ये या क्षेत्रातील कंपन्यांनी २०३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 

व्होडाफोन आयडियाने २५ मार्चपासून ते १५ जूनदरम्यान २०३ टक्क्यांसह या क्षेत्रात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. २५ मार्चला यांची किंमत प्रति समभाग ३.३५ रुपये होती. १५ जूनला ही १०.१५ रुपये झाली. भारती इन्फ्राटेल आणि रिलायन्स समूहानेदेखील या काळात ५१.१ टक्के परतावा दिला आहे. भारती इन्फ्राटेलच्या समभागाची किंमत १४७.५ वरून २२२.९ रुपये आणि रिलायन्सच्या समभागाची किंमत १,०६८ वरून ‌वाढून १,६१५ वर पोहोचली आहे. भारती एअरटेलच्या समभागाची किंमत ४२९.१ वरून वधारत ५५०.७ झाली आहे. स्टॉक अॅनालिस्ट कंपनी एंजल ब्रोकिंगनुसार, भारती एअरटेलच्या महसूल व एबिटामध्ये अनुक्रमे १५.१ % व ५१.७ % वाढ झाली आहे. एआरपीयूमधील वाढ यामागील कारण आहे. भारती एअरटेल व रिलायन्स जिओच्या एआरपीयूमध्ये वाढ होऊ शकते. रिलायन्समध्ये फेसबुक व इतर कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे सकारात्मकता दिसत आहे.सेमको सिक्युरिटीजचे रिसर्च हेड उमेश मेहता यांनी सांगितले. मात्र व्होडा-आयडियाच्या समभागांच्या किमतीही कमी असल्याने वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...