आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Tesla Car | Tesla Auto | Marathi News | Big Auto Companies Ready To Ride Tesla; Ready To Spend Millions Of Rupees On Electric Cars

उद्योगावर वर्चस्व:टेस्लावर कुरघोडी करण्यासाठी बड्या वाहन कंपन्या सज्ज; इलेक्ट्रिक कारवर लाखो कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात जगातील कार उद्योगावर कोण वर्चस्व गाजवणार या विचारातून आता बड्या वाहन कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. टोयोटा, फोक्सवॅगन आणि मर्सिडीज-बेंझ कंपन्या अमेरिकेच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या टेस्लाकडून अव्वल क्रमांक हिसकावून घेण्यासाठी इलेक्ट्रिक कारच्या विकासावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या कारचे युग आता सुरू झाले आहे.

बाजारात अव्वल क्रमांकावर राहायचे तर इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढवावे लागणार, याची जाणीव फोक्सवॅगन आणि टोयोटा मोटर कॉर्प या जगातील दोन मोठ्या कार निर्मात्या कंपन्यांना झाली आहे. गेल्या महिन्यात पाच दिवसांत या कंपन्यांनी १७ हजार कोटी डॉलरची (१२.६४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली असून अनेक दशकांपासून वर्चस्व असलेल्या उद्योगावर त्यांचा दावा कायम ठेवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.

फॉक्सवॅगनने ९ डिसेंबर रोजी इलेक्ट्रिक कार उत्पादनावर १० हजार कोटी डॉलर (७.४३ लाख कोटी रुपये) खर्च करण्याची घोषणा केली, तर टोयोटाने १४ डिसेंबर रोजी इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी ७,००० कोटी डॉलरची (५,२०,४५० काेटी रुपये) गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. फोक्सवॅगनने २०२१ च्या पहिल्या १० महिन्यांत ३.२२ लाख इलेक्ट्रिक कारची विक्री केली. दरवर्षी अशा ६ लाख गाड्यांच्या विक्रीचे ठेवलेले लक्ष्य हे निम्म्याहून अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...