आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्करी पडली महागात:टेस्लाच्या शेअरची किंमत जास्त असल्याचे मस्क यांनी ट्विट करताच कंपनीचे मूल्य 1 लाख कोटींनी घटले

कॅलिफोर्निया2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • टेस्ला सीईओ मस्क यांना ट्विटरवर केलेली मस्करी पडली चांगलीच महागात

इलेक्ट्रिक वाहने बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टेस्लाचे संस्थापक अॅलन मस्क यांनी एक ट्विट केल्यानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे १.३ लाख कोटी रुपयांची घट झाली. यामुळे मस्क यांचेही २२.६ हजार कोटींचे नुकसान झाले. १ मे रोजी मस्क यांनी अनेक ट्विट केले. त्यात त्यांनी टेस्ला कंपनीच्या शेअरला सर्वाधिक किंमत असलेला म्हटले होते. तसेच त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता विकण्याबद्दलही म्हटले होते. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, माझी प्रेमिका आणि पाॅप संगीतकार ग्रिम्स माझ्यासाठी वेडी आहे. मस्क यांचे ट्विटरवर ३.३ काेटी फॉलोअर आहेत. २.७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह ते जगात २४ व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. मस्क यांनी ट्विट केले की कंपनीच्या शेअरची किंमत खूप जास्त आहे. 

यानंतर काही वेळेतच बाजारात आधीच्या अर्ध्या तासातच टेस्लाच्या शेअरमध्ये सुमारे १२% ची घसरण झाली. नंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसली. मस्क यांनी पहिल्यांदाच मस्करी केलेली नाही. याआधी त्यांनी आॅगस्ट २०१८ ला ट्विटरवर म्हटले होते की, त्यांना टेस्ला खासगी कंपनी करायची आहे. या ट्विटनंतर कंपनीच्या शेअरच्या किमतीत २०% पर्यंत घट झाली होती. तसेच न्यूयॉर्क शेअर बाजारात टेस्लाच्या भविष्याबद्दल आपत्तीजनक ट्विट केल्याने ३०४ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या ट्विटनंतर त्यांना कंपनीचे सीईओ पद सोडावे लागले होते.

हास्यास्पद विधानांमुळे नेहमीच मस्क वादात

मस्क विनोदी आणि हास्यास्पद विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. २०१८ मध्ये थायलंडच्या गुहेत अडकलेल्या फुटबॉल खेळणाऱ्या १२ मुलांना वाचवणाऱ्या इंग्लंडच्या गोताखोरावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. गोताखोरने मस्कविरोधात मानहानीचा दावा केला होता. याच वर्षी अमेरिकेत लाइव्ह कार्यक्रमात दारू पिताना आणि चिलीम फुंकताना दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...