आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Allen Family Has Been Included In Forbes India, One Of The Four Most Influential Businesses In The Country

कोटा:फोर्ब्ज इंडियात अॅलन कुटुंबाचा समावेश, देशातील चार मोठ्या प्र‌भावी बिझनेसमध्ये झाला समावेश

कोटाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोर्ब्जमध्ये समावेश झालेले राजस्थानमधील हे एकमेव कुटुंब आहे

मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध करिअर इन्स्टिट्यूटने आपल्या नावीन्याच्या बळावर मोठे यश मिळवले आहे. अॅलन करिअर इन्स्टिट्यूटचा फोर्ब्ज इंडिया मॅगझिनने देशातील सर्वात प्रभावशाली चार उद्योजक कुटुंबांमध्ये समावेश केला आहे. फोर्ब्ज मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्याच्या आवृत्तीत छापून आलेल्या लेखात चार मोठ्या उद्योजक कुटुंबांचा समावेश आहे.

ज्यात अरुणाचल प्रदेश, केरळ, कोलकाता आणि कोटामधील अॅलन करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक माहेश्वरी कुटंुबाचाही समावेश आहे. फोर्ब्जमध्ये समावेश झालेले राजस्थानमधील हे एकमेव कुटुंब आहे. या लेखामध्ये अॅलन करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक गोविंद माहेश्वरी, राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी, बृजेश माहेश्वरी यांच्यासह त्यांची पुढची पिढी अविरल माहेश्वरी, अमन माहेश्वरी, आनंद माहेश्वरी, केशव माहेश्वरी व आराध्य माहेश्वरी यांचा उल्लेख आहे. अॅलनचे संचालक गोविंद माहेश्वरी म्हणाले, फोर्ब्ज मॅगझिनमध्ये समावेश होणे केवळ अॅलन कुटुबांसाठीच नव्हे, तर कोटा शहरासाठी गर्वाची बाब आहे. अॅलनशी जोडले गेलेले लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्येही अॅलन करिअर इन्स्टिट्यूटमध्ये सध्या १ लाख १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, तर ओमान, बहरीन, सौदी अरेबिया, कुवेत आणि कतारमधून अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षांची तयारी करत आहेत.