आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The Ban On Chinese Apps Has Hit One In Three Smartphone Users, Making It Possible To Ban Games Like Pubji

अॅपवर बंदी:चिनी अॅपवरील बंदीमुळे तीनपैकी एका स्मार्टफोन युजरला फटका, पबजीसारख्या गेमवर बंदी शक्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंदी घातलेले अनेक अॅप चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये प्री-इन्स्टॉल्ड

सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतात दर तीनपैकी किमान एका स्मार्टफोन युजरवर परिणाम होईल. आगामी काळात बंदी घातलेल्या अनेक अॅप्समध्ये आणखी काहींचा समावेश होऊ शकतो. यात पबजीसारख्या लोकप्रिय मोबाइल गेमचाही समावेश आहे. मुंबईतील थिंक टँक गेटवे हाऊसचे संचालक ब्लेइसे फर्नांडिस यांच्यानुसार, सरकारद्वारे जारी यादीत अनेक महत्त्वाच्या नावाचा समावेश नाही. काउंटर पॉइंटच्या एका विश्लेषणानुसार अनेक चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये यूसी ब्राऊझर, यूसी न्यूज, शेअरइटसह अनेक अॅप प्री-इन्स्टॉल्ड असतात. या कंपन्यांना येणाऱ्या डिव्हाइसमध्ये बदल करून ही अॅप्स काढावी लागू शकतात.

सरकारकडे बंदी घालण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध : सरकारकडे चायनीज अॅपवर बंदी लागू करण्यासाठी दोन पर्याय आहेत. त्यात पहिला पर्याय इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून बंदी घालावी लागेल. दुसरीकडे, दुसरा पर्याय या अॅप्सला प्ले स्टोअरमधून बाहेर काढावे लागेल. दोन्ही पर्याय एकाचवेळी वापरले जाऊ शकतात. असे असले तरी, तज्ञांनुसार, दोन्ही प्रकारच्या पर्यायात काही त्रुटी असू शकतात. देशात सध्या ज्या पद्धतीचे चीनविरोधी वातावरण आहे, ते पाहता युजर या प्रतिबंधित अॅप्सचा क्वचितच वापर करतील.

0