आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Batch Of Coffee Is Tested Three Times, The Seeds Are Also Selected, The Employees Are Called Partners

ब्रँडच्या यशाची कहाणी:कॉफीच्या बॅचची तीनदा चाचणी, बियासुद्धा निवडक, कर्मचाऱ्यांना म्हटले जाते भागीदार

हार्वर्डएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टारबक्स | कॉफी हाऊस कंपनी -स्थापना १९७१ -बाजारमूल्य ८.५ लाख कोटी रु.

लोक स्टारबक्स या जगातील सर्वात मोठ्या कॉफी हाऊस कंपनीला लक्झरी म्हणून पाहतात. ८४ देशांतील यांच्या ३४,६३० स्टोअर्समध्ये दररोज लाखो लोक कॉफी पिण्यासाठी येतात. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, स्टारबक्सने गेल्या ५० वर्षांत आपली विश्रांतीचे ठिकाण म्हणून ओळख बनवली आहे. इथे लोक कॉफीला ‘परवडणारी लक्झरी’ मानतात. फॉर्च्यून ५०० मध्ये १२० व्या क्रमांकावर असलेली स्टारबक्स सध्या सीईओच्या नियुक्तीबद्दल चर्चेत आहे. भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिंहन यांना कंपनीने १४० कोटी रु. वार्षिक पॅकेज दिले. भारतातील पहिले स्टारबक्स स्टोअर २०१२ मध्ये मुंबईत उघडले व आता २५२ स्टोअर्स आहेत. टाटा समूहासह त्याची देशात ५०-५०% भागीदारी आहे. ब्रँड स्टोरीत वाचा स्टारबक्सची कथा...

रोस्टेड कॉफी बीनने झाली सुरुवात १९७१ मध्ये जेरी बाल्डविन, जेव्ह सिगल, गॉर्डन बोकर यांनी सिएटलमध्ये पहिले स्टारबक्स स्टोअर उघडले. त्या वेळी फक्त ताज्या भाजलेल्या कॉफी बीन्स, चहा व मसाले स्टोअरमध्ये उपलब्ध होते. १९८२ मध्ये हॉवर्ड शुल्ट्झ कंपनीत सामील झाले आणि इटालियन मॉडेलचा अभ्यास केला, त्यानंतर कॉफी आणि पेये विकण्याची स्टारबक्सच्या मालकांना परवानगी मागितली. शुल्ट्झ यांनी नंतर कंपनी सोडली व सिएटलमध्ये स्वतःची कॉफी चेन सुरू केली. दोन वर्षांनी १९८७ मध्ये शुल्ट्झ परत आले आणि स्टारबक्स विकत घेतली.

स्टारबक्सला जागतिक ब्रँड बनवणारे हार्वर्ड शुल्ट्झ २०१८ मध्ये निवृत्त झाले, पण फेब्रुवारी २०२२ मध्ये हंगामी सीईओ झाले. ६९ वर्षीय शुल्ट्झ २७ हजार कोटी रु. मालमत्तेचे मालक आहेत.

५० वर्षांत चार वेळा बदलला लोगो स्टारबक्स नाव हर्मन मेलव्हिलच्या मोबि-डिक (१८५१) या कादंबरीवरून घेतले. लोगोमधील ‘सायरन’ ग्रीक पौराणिक कथांवर आधारित आहे, तो अर्धी स्त्री व अर्धा पक्षी आहे. १९८७ मध्ये त्याचा रंग तपकिरीवरून हिरवा झाला. त्यानंतर १९९२ व पुन्हा २०११ मध्ये त्याचे स्वरूप बदलले.

परफ्यूम वापरण्यास मनाई, चवीवर परिणामाची भीती स्टारबक्समध्ये काम करणाऱ्यांना कर्मचारी नव्हे, भागीदार म्हणतात. अर्धवेळ काम करणाऱ्यांनाही शेअरचा पर्याय मिळतो. कोविडच्या काळात इतर कंपन्या लोकांना नोकरीवरून काढून टाकत होत्या तेव्हा स्टारबक्स स्टाफ ट्रेनिंगसह कॉफी टेस्टिंगसारख्या इतर कोर्समध्ये गुंतवणूक करत होते. मात्र, कंपनीबाबतचे वादही कायम राहिले. गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला कार्यालयात ३ मिनिटे उशिरा आल्याने नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. याशिवाय चीनमध्ये जादा किमती हा वादाचा विषय बनला. स्टारबक्समधील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असतो. कर्मचाऱ्यांना स्टोअरमध्ये परफ्यूम, उच्च वास असलेला डिओ लावण्याची परवानगी नाही. यामुळे कॉफीचा सुगंध आणि चवीवर परिणाम होऊ शकतो.

नॉर्थ अमेरिका सर्वात मोठे मार्केट, २ वर्षांत कर्जात वाढ स्टारबक्सचा महसूल तीन प्रमुख विभागांमधून येतो. पहिली कंपनी संचालित स्टोअरद्वारे, दुसरे परवाना शुल्काद्वारे आणि तिसरे इतर माध्यमांद्वारे. यापैकी ८०% पैसे कंपनी संचालित स्टोअरमधून येतात. कंपनी रोस्टिंग, मार्केटिंग आणि विशेष कॉफी तसेच पेये, खाद्यपदार्थ आणि ब्रँडेड उत्पादने याद्वारे कमाई करते. पेयांद्वारे सर्वाधिक ६१% उत्पन्न मिळते. विक्रीच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर अमेरिका विभाग सर्वाधिक कमाई करतो. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल २.३१ लाख कोटी इतका होता. पण त्याच प्रमाणात कर्जही वाढत आहे. २०१९ मध्ये कंपनीवर अल्प मुदतीचे कर्ज ४० कोटी रुपये होते, ते २०२१ मध्ये १८ हजार कोटींवर गेले, तर दीर्घकालीन कर्ज १.७१ लाख कोटी रु. झाले.

अरेबिका कॉफी बीन्सचा वापर करते स्टारबक्स जगभरात कॉफीच्या वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत, परंतु प्रामुख्याने दोन जाती प्रमुख आहेत - अरेबिका आणि रोबस्टा. यामध्ये रोबस्टा कमी उंचीच्या भागात आढळते, ती सहसा आफ्रिकेत आढळते. तर, अरेबिका कॉफीची रोपे तीन ते सहा हजार फूट उंचीच्या भागात आढळतात. इथल्या थंड रात्री आणि गरम दिवसांमुळे बीन्स दाट होतात आणि त्यामुळे त्यांची चव इतरांपेक्षा वेगळी असते. स्टारबक्स सुरुवातीपासून या अरेबिका बीन्स वापरत आहे. लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील कॉफी उत्पादकांशी त्यांनी करार केला आहे. स्टारबक्स त्याच्या केंद्रांवर दररोज किमान एक हजार कप कॉफीची चाचणी घेते. कॉफीची एक बॅच बाजारात जाण्यापूर्वी तज्ज्ञांकडून तिची तीनदा चाचणी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...