आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Best 3 Headsets With Stereo Sound And Deep Bass Will Make The Game Interesting | Marathi News

युट्युबर तेलंग सोबत Tech Talk:स्टिरीओ साऊंड आणि डीप बेस असलेले सर्वोत्कृष्ट 3 हेडसेट, खेळाला मनोरंजक करतील

नवी दिल्‍ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोत्कृष्ट गुणवत्तेसह सर्वांच्या बजेटमध्ये असलेला गेमिंग हेडसेट

आजच्या युगात प्रत्येक घरात ऑनलाइन गेमिंग मध्ये 'उस्ताद' असलेला एक 'छुपा रुस्तम' असतो आणि त्याला हवा असतो एक चांगला गेमिंग हेडसेट. सर्वोत्कृष्ट गुणवत्तेसह सर्वांच्या बजेटमध्ये असलेला गेमिंग हेडसेट कोणता? असा प्रश्न अशा वेळी उपस्थित होतो. मात्र, त्यासाठी आता त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. बजेट मध्ये असलेले आणि चांगली गुणवत्ता देणारे अशा गेमिंग हेडसेट बाबत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

लॉजिटेक G435

किंमत - 7,495

लॉजिटेक G435 हा चांगला हेडसेट आहे. हा हेडसेट दिसायला अत्यंत स्टायलिश आणि त्याचबरोबर वजनाने हलका देखील आहे. त्याचे कुशन कम्फर्टेबल आणि त्याचबरोबर चांगली पकड देणारे आहेत. हा हेडसेट PC, PS4, PS5 सोबत सहज कनेक्ट होतो आणि सर्वांसोबत कम्फर्टेबल देखील आहे. 18 तास बॅटरी बॅकअप असल्यामुळे जास्त वेळ गेम खेळण्यात मदत होते. मात्र या हेडसेट मध्ये तुम्हाला 3.5mm जॅक मिळत नाही आणि त्याचबरोबर यामध्ये बूम माइक देखील देण्यात आलेला नाही. हेडसेट खरेदी करण्यासाठी तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

2. रेझर ब्लॅक शार्क V2 प्रो

किंमत - 18,000

जर तुम्ही तुमचे बजेट वाढवू इच्छित असाल तर 'रेझर ब्लॅक शार्क V2 प्रो' हा एक चांगला पर्याय आहे. रेझर ब्लॅक शार्क V2 प्रो हा एक प्रोफेशनल ग्रेड हेडसेट आहे. अनेक युट्युबर आणि गेम्सर्स याचा वापर करतात. हा हेडसेट वजनाने अत्यंत हलका आणि कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जास्त वेळ गेम खेळायचा असल्यास हा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रेझर ब्लॅक शार्क V2 प्रो मध्ये तुम्हाला डीटॅचेबल बूम माईक मिळतो त्याच बरोबर यासोबत तुम्हाला 3.5mm ऑडिओ जॅक देखील मिळतो. कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळण्यासाठी 24 तासांचा बॅटरी बॅकअप देखील मिळतो.

3. हायपरएक्स क्लाऊड II

किंमत - 9,900

हेडसेट साठी तुमच्याकडे असलेले बजेट कमी किंवा जास्त नसेल तर तुमच्यासाठी 'हायपरएक्स क्लाऊड II' हा चांगला पर्याय आहे. यामध्ये अत्यंत साधी डिझाईन देण्यात आली आहे आणि हा खेळताना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करतो. त्याचबरोबर अत्यंत आरामदायी देखील आहे. यामध्ये 53mm ऑडिओ ड्रायव्हर देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत स्पष्ट आवाज ऐकू येतो. यामध्ये 7.1 सराउंड सिस्टिम तुम्हाला वास्तविक ऑडिओ ऐकण्याची सुविधा देते. त्याचबरोबर 'डिटॅचेबल नॉईस कॅन्सलिंग माइक' याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो.

बातम्या आणखी आहेत...