आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, काेरोना महामारी हे मोठे संकट आहे. मात्र ही समस्या जितकी आहे त्यापेक्षा तिचा जास्त बागुलबुवा करण्यात आला. भारतीय शेअर बाजार लवकरच नव्या टप्प्यातील तेजी म्हणजेच बुल रन अनुभवेल. हा बुल रन आजवरचा सर्वात मोठा असू शकेल. देशात एकदा लाॅकडाऊन संपले की सरकार खर्च वाढेवल. झुनझुनवाला म्हणाले, घसरणीनंतर येणाऱ्या तेजीचा ट्रेंड म्हणजेच बुल मार्केट ट्रेंड नेहमीच आधीपेक्षा मोठा असतो. बुल मार्केट कसोटी सामन्यासारखा असतो, तो ५० षटकांच्या वनडेसारखा नसतो. मार्चमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मन:स्थितीवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र आता स्थिती सुधारू लागली आहे. येथून पुढे बाजार मजबूत होऊ लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. बाजारातील सद्य:स्थिती दर्शवतेय की आता वेगाने सर्व गोष्टी पूर्वपदावर येतील.
कोरोना हा फ्लू आहे, प्लेग वा कॅन्सर नव्हे
झुनझुनवाला म्हणाले, ‘काेरोना ही मोठी समस्या आहे. मात्र त्याच्यामुळे जास्तच अनावश्यक मनोवैज्ञानिक भीती उत्पन्न झाली आहे. कोरोना हा एक फ्लूच आहे, प्लेग किंवा कर्करोगासारखा आजार नव्हे.आपण पुन्हा प्रवास करायला सुरुवात करू, रेस्तराँही पूर्वीप्रमाणे सुरू होतील. बहुतांश कंपन्या कोरोनाच्या संकटातून सावरतील. संकट संपल्यानंतर आपण पुन्हा विकासाकडे आगेकूच करू. तथापि, काही कंपन्यांना पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी संघर्ष करावा लागेलच.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.