आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत कलात देशातील बाजारात सोमवारी मंदी वरचढ ठरली. व्यवसायादरम्यान त्यांच्या विक्रीचाही दबाव वाढला. याचा परिणाम म्हणजे सेन्सेक्स-निफ्टीत या वर्षीची सर्वात मोठी घसरण नोंदली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,१४५.४४ अंक (२.२५%) घसरून ५०,००० च्या खाली आला आणि ४९,७४४.३२ वर बंद झाला. याच पद्धतीने एनएसईच्या निफ्टीत ३०६.०५ अंकाची (२.०४%) घसरण राहिली. हाही १४,७०० च्या पातळीखाली येऊन १४,६७५.७० वर बंद झाला. देशाच्या शेअर बाजारांत सलग पाचव्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. याआधी गेल्या मंगळवारी व्यवसायादरम्यान त्यांनी अनुक्रमे ५२,५१६.७६ आणि १५,४३१.७५ च्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. यानंतर आतापर्यंत सेन्सेक्स २७७२.४४ अंक (५.२८%) आणि निफ्टी ७५६. अंक (४.९०) खाली आला. बाजारतज्ञानुसार, एका वर्षादरम्यान देशातील शेअर बाजाराने चांगली वृद्धी प्राप्त केली आहे.
एक-दोन आठवड्यांत बाजार स्थिर झाला पाहिजे : विश्लेषक
विश्लेषकांनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया बराच बळकट आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे निकाल चांगले राहिले आहेत. काही प्रकरणांत विश्लेषकांनी अर्निंग ग्रोथला ३०% पर्यंत री-रेट केले आहे. या हिशेबाने पाहिल्यास शेअर बाजारात मूल्यांकन एवढे जास्त वाटत नाही. अशा स्थितीत देशातील शेअर बाजाराचा ट्रेंड सकारात्मक असला पाहिजे. मात्र, एक शॉर्ट टर्म करेक्शन आवश्यक होते. एक-दोन आठवड्यांत बाजार स्थिर झाला पाहिजे. सध्याच्या अस्थिरतेत निफ्टी निर्देशांक १४,३०० पर्यंत घसरू शकतो.
बाजारातील घसरणीची पाच कारणे
1. देशात कोरोना प्रकरणात तेजी आल्याने आर्थिक हालचालींवर निर्बंध वाढणे
2. आंतरराष्ट्रीय बाजारांतील कमकुवतपणाचे संकेत मिळाल्याने धारणेवर परिणाम झाला.
3. मासिक वायदा सौद्याची शेवटची तारीख जवळ आल्याने अस्थिरता वाढली आहे.
4. अमेरिकेत बाँड यील्ड, महागाई वाढत आहे. कोरोनामुळे निर्बंध वाढले आहेत.
5. देशातील बाजारात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह मंद पडला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.